‘ॲग्रोवन’च्या प्रचाररथाला अकोल्यात हिरवा झेंडा

‘ॲग्रोवन’च्या प्रचाररथाला अकोल्यात हिरवा झेंडा
‘ॲग्रोवन’च्या प्रचाररथाला अकोल्यात हिरवा झेंडा

अकोला : दैनिक ‘अॅग्रोवन’च्या वाचकांसाठी येत्या १ नोव्हेंबर २०१८ पासून ‘समृद्ध शेती बक्षीस योजना २०१८’ सुरू होत असून, योजनेच्या प्रचाराला सोमवारी (ता. २९) प्रारंभ झाला. अकोल्यात या प्रचाररथाला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात अाला.

‘ॲग्रोवन’च्या वाचकांसाठी ३० लाखांपेक्षा अधिक रकमेची १७३८ पेक्षा अधिक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध होणार अाहे. या भव्य वाचक योजनेच्या प्रचारासाठी गावागावात हा रथ फिरणार अाहे.

अकोल्यात झालेल्या कार्यक्रमाला नगरसेवक पराग कांबळे यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला सकाळचे सहयोगी संपादक संदीप भारंबे यांच्यासह ‘सकाळ-ॲग्रोवन`चे ज्येष्ठ वितरक लक्ष्मीकांत कानेटकर, प्रसाद कानेटकर व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com