agriculture news in marathi, green gram and black gram harvesting statistics to be reported till 28 september | Agrowon

मूग, उडीद पीककापणीची माहिती २८ पर्यंत कळवावी ः कृषिमंत्री
मारुती कंदले
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

सदोष बियाण्यांमुळे ज्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश संबंधित बियाणे कंपन्यांना देण्यात आले आहेत.
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मूग आणि उडदाच्या पीककापणीची आकडेवारी २८ सप्टेंबरपर्यंत कृषी विभागाला कळविण्यात यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी (ता. २४) दिले.

सह्याद्री अतिथीगृहावर कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृषी आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री म्हणाले, की या वेळी मूग आणि उडदाच्या पीककापणीची आकडेवारी २८ सप्टेंबरपर्यंत कृषी विभागाला कळविण्यात यावी, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्ह्यांना देण्यात येत आहेत. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून पीकविमा प्रक्रियेला सुरवात करण्यात येईल आणि ऑक्टोबरअखेरपर्यंत शेतकऱ्याला पीकविम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात मिळावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

कापसाच्या पिकाचेदेखील नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी सीसीआयने परवानगी दिली तर त्यांच्या परवानगीसह अन्यथा त्यांच्या परवानगीशिवाय कापसाच्या खरेदीसाठी राज्य शासनामार्फत कापूस खरेदी केंद्र उभारण्यात येईल. खरीप हंगामाअखेर सोयाबीनच्या पिकाचे जे नुकसान झाले आहे, त्याच्या पाहणीकरिता संबंधित क्षेत्रातील कृषी अधिकाऱ्यांनी त्वरित पीकक्षेत्राला भेटी द्याव्यात व झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून अहवाल विभागाला सादर करावा, असे निर्देशही कृषिमंत्र्यांनी या वेळी दिले.

तसेच १७ पदे पदोन्नतीने भरण्यास पदोन्नती समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना १ लाख ७० हजार कोटी क्विंटल हरभरा बियाण्यांचे वितरण कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. गतवर्षी १ लाख ३७ हजार बियाण्यांचे वितरण करण्यात आले होते.

शेतकऱ्यांच्या हाती अधिकाधिक प्रमाणात देशी बियाणे देण्यावर शासनाचा भर असणार आहे. नाशिकमध्ये कृषी सहायक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतात. हा प्रयोग राज्यभर राबविण्याचा विचार राज्य शासन करत असून, त्यासाठी परिपत्रक काढले जाणार असल्याची माहितीदेखील कृषिमंत्र्यांनी या वेळी दिली.
 

इतर अॅग्रो विशेष
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...
असा घ्यावा मातीचा नमुना मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला...
हिरवळीच्या खतांवर भर द्या : सुभाष शर्मायवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती...
कापूस आयात शुल्कवाढीचा विचारमुंबई ः केंद्र सरकारने देशांतर्गत शेतमालाचे दर...
कृषी संजीवनी प्रकल्पाचे एक पाऊल पुढेमुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,...
कृषी, घरगुती पाणी वापर दरात १७ टक्के...मुंबई: महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...
फळबागेचे फुलले स्वप्न‘माळरानात मळा फुलला पाहिजे` हे वडिलांचे वाक्‍य...
नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी महोत्सवास...नाशिक : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे...
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...