agriculture news in marathi, Green gram sowing reaches 18 thousand hectar in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात १८ हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगाम पेरणीच्या कामांना वेग आला आहे. यामध्ये सर्वाधिक १८ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली असून, या आठवड्यात गव्हाची पेरणीदेखील सुरू झाली आहे. यंदा तापीकाठावरील गावांमध्ये गव्हाची पेरणी अधिक राहील; परंतु इतरत्र मात्र गव्हाची फारशी पेरणी होणार नसल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात एक लाख ३८ हजार हेक्‍टरवर रब्बी हंगाम उभा राहील, असा अंदाज कृषी विभागाने यापूर्वी व्यक्त केला आहे. यानुसार खते, बियाणे आदींची नियोजन कृषी विभागाने केले आहे. हरभरा, गहू याचे अनुदानावर वितरणाचे बियाणे उपलब्ध झाले असून, त्याचे वितरण कृषी विभागाने सुरू केले आहे. 

जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगाम पेरणीच्या कामांना वेग आला आहे. यामध्ये सर्वाधिक १८ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली असून, या आठवड्यात गव्हाची पेरणीदेखील सुरू झाली आहे. यंदा तापीकाठावरील गावांमध्ये गव्हाची पेरणी अधिक राहील; परंतु इतरत्र मात्र गव्हाची फारशी पेरणी होणार नसल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात एक लाख ३८ हजार हेक्‍टरवर रब्बी हंगाम उभा राहील, असा अंदाज कृषी विभागाने यापूर्वी व्यक्त केला आहे. यानुसार खते, बियाणे आदींची नियोजन कृषी विभागाने केले आहे. हरभरा, गहू याचे अनुदानावर वितरणाचे बियाणे उपलब्ध झाले असून, त्याचे वितरण कृषी विभागाने सुरू केले आहे. 

यंदा परतीच्या पावसामुळे हरभरा व दादर (ज्वारी) पेरणीची उभारी मिळाली. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी तर काहींनी लागलीच दिवाळीनंतर पेरणी केली. हरभरा व दादर चोपडा, यावल, जळगाव, अमळनेर भागात तरारले आहेत. हरभरा व दादर ही कोरडवाहू पिके घेण्यास अनुकूल स्थिती आहे.

दुसऱ्या बाजूला यंदा पावसाळा हवा तसा नसल्याने अमळनेर, भडगाव, बोदवड, जामनेर, चाळीसगाव आदी भागात विहिरी, कूपनलिकांना हवे तसे पाणी नाही. त्यामुळे गहू, मका ही अधिक पाण्याची पिके या भागातही कमी असल्याचे सांगण्यात आले. हरभऱ्याचे क्षेत्र जिल्ह्यात ६० ते ७० हजार हेक्‍टरपर्यंत असेल. त्यापाठोपाठ मका, ज्वारी, गहू यांचे क्षेत्र असणार आहे. दादरची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे.

ऑक्‍टोबरअखेरपर्यंत दादरची पेरणी पूर्ण करून घेण्याचा संकेत शेतकरी पाळतात. 
यावल, जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर, रावेरमधील तापीकाठावरील भागात गव्हाची पेरणी सुरू झाली आहे. तसेच मका लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सूक्ष्मसिंचन यंत्रणेचा वापर मका पिकासाठी केला आहे. 

करडई, सूर्यफूल नगण्य
जिल्ह्यात करडई तर जणू नामशेष झाल्याची स्थिती आहे. तर सूर्यफुलाची देखील फारशी पेरणी झालेली नसल्याचे सांगण्यात आले. करडईची पेरणी आसोदा, नशिराबाद (ता.जळगाव) भागात काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने अजूनही करतात, असे सांगण्यात आले. 

दादर, हरभऱ्याची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. आता बागायती किंवा सिंचनाखालील क्षेत्रात मका, गहू, हरभरा यांची पेरणी सुरू आहे. यंदा आमच्या भागात 
हरभरा व दादर अधिक आहे. 
- किशोर चौधरी, 
शेतकरी, आसोदा (ता.जळगाव)

आमच्याकडे दुष्काळी स्थिती आहे. मका, गहू फारसा दिसत नाही; परंतु काही भागात हरभरा, ज्वारी पेरणी झालेली आहे. 
- नाना पाटील, शेतकरी, बोदवड

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...