‘ग्रीन होम एक्स्पो’ला पुण्यात प्रारंभ

पुणे ग्रीन होम एक्स्पो
पुणे ग्रीन होम एक्स्पो

पुणे : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या वतीने सेकंड होम, वीकएंड होम, फार्म हाउस प्रकल्पांच्या ‘ग्रीन होम एक्स्पो सीझन २०’ या अनोख्या प्रदर्शनास पुण्यातील स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवारी प्रारंभ झाला. प्रदर्शनाचा आज (ता. १७) शेवटचा दिवस असून, सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार असून, प्रवेश विनामूल्य असणार आहे.  शनिवारी (ता. १६) मायभूमी रियॅलिटीचे संचालक मारूती येडगे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. एस. आर. ग्रुपचे देवेंद्र राठोड, ग्रीन लॅँड अॅग्रो फार्म्सचे प्रतीक खरपुरिया, सप्तर्षी डेव्हलपर्सचे संजय ढमढेरे, शामराव कर्पे, सिनर्जी प्राॅपर्टीजचे संजय शिंदे, अर्बन लॅँडमार्कचे पंकज नवलाखा आणि समृद्धी डेव्हलपर्सचे ओंकार कुदळे व गणेश तोडकर आदी याप्रसंगी उपस्थित होते. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कुटुंबीयांसह निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते, तसेच निसर्गाच्या कुशीत आपले छाेटेसे घर असावे, फार्म हाउस आणि शेती असावी, असेही स्वप्नदेखील अनेक कुटुंबे उराशी बाळगून असतात. नागरिकांचे हेच स्वप्न साकारण्यासाठी ‘सकाळ - अॅग्रोवन’च्या वतीने प्लॉटिंगचे ‘ग्रीन होम एक्‍स्पो सीझन २०’चे ‘मायभूमी रियॅलिटी’ यांच्या सहयोगाने आयोजन करण्यात आले आहे.  ग्रीन होम एक्‍स्पोची १९ प्रदर्शने ग्राहकांच्या प्रतिसादाने यशस्वी झाली आहेत. खास ग्राहकांच्या आग्रहास्तव पुन्हा विसाव्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग्रीन होम एक्‍स्पो सीझन २०’ हे प्रदर्शन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. राज्याच्या विविध भागांतील ३० पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक यात सहभागी झाले अाहेत. भोर, पानशेत, शिरवळ, लोणावळा, खेडशिवापूर, नसरापूर, गुहागर, फुलोरा अांबी, शिक्रापूर, तळेगाव ढमढरे, तळेगाव दाभाडे, कामशेत, हिंजवडी, दापोली, ताम्हीणी घाट, पिरंगुट, पुरंदर या भागांतील अनेक प्रकल्पांचा पर्याय नागरिकांना उपलब्ध आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com