agriculture news in marathi, green list removed form gov portal for loanwaiver | Agrowon

‘ग्रीन लिस्ट’ काढून टाकण्याची सरकारवर नामुष्की
तानाजी जाधवर
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

उस्मानाबाद : कर्जमाफी झाली असे म्हणत सरकारने ग्रीन लिस्ट प्रदर्शित केली होती. मात्र उस्मानाबादमध्ये प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांची नावेच या ग्रीन लिस्टमध्ये नव्हती. त्यामुळे सरकारने ही ग्रीन लिस्ट दुरुस्त करण्यास सुरवात केल्याचे दिसून येत आहे. संकेतस्थळावर आता ‘अपडेटिंग’ असे पाहायला मिळत आहे. सरकारच्या घाईमुळे प्रशासनावर ग्रीन लिस्ट काढून टाकण्याची नामुष्की ओढावल्याचे वास्तव समोर आले आहे.

उस्मानाबाद : कर्जमाफी झाली असे म्हणत सरकारने ग्रीन लिस्ट प्रदर्शित केली होती. मात्र उस्मानाबादमध्ये प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांची नावेच या ग्रीन लिस्टमध्ये नव्हती. त्यामुळे सरकारने ही ग्रीन लिस्ट दुरुस्त करण्यास सुरवात केल्याचे दिसून येत आहे. संकेतस्थळावर आता ‘अपडेटिंग’ असे पाहायला मिळत आहे. सरकारच्या घाईमुळे प्रशासनावर ग्रीन लिस्ट काढून टाकण्याची नामुष्की ओढावल्याचे वास्तव समोर आले आहे.

प्रत्यक्ष कर्जमाफीला वेळ लागत असल्याने सरकारविरोधात रोष वाढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीचा दिवस निश्चित करून तो जाहीर केला. ठरलेल्या दिवशी (ता. १८ ऑक्टोबर) प्रातनिधिक स्वरूपात लोकांना प्रमाणपत्र वाटण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते; तर राज्य स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. दोन दिवसानंतर त्यातील त्रुटी दिसून येऊ लागल्या. ग्रीन लिस्टमध्ये प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांची नावे नसल्याचे उघड झाले.

सरकारवर नामुष्की ओढावली. त्याच दिवशी हा कार्यक्रम घेणे बंधनकारक केल्याने सहकार विभागाने त्यांच्या स्तरावर लाभ मिळतील अशी नावे काढली होती; पण त्यांची नावे यादीत न आल्याने सगळा गोंधळ उडाला होता. दैनिक ‘सकाळ’ने ही बाब सर्वप्रथम निर्दशनास आणून दिली.

दुसऱ्या दिवशी रविवारची सुटी आल्याने त्यामध्ये काही बदल करणेही शक्य नव्हते. त्यामुळे सोमवारी सकाळीच या संकेतस्थळावरील प्रदर्शित करण्यात आलेल्या यादीमध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरू झाले. घाईगडबडीत प्रदर्शित केलेल्या यादी काढून टाकण्याची नामुष्की सरकारवर ओढावली असून, किमान आता तरी यातून सरकार बोध घेईल, अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करत आहे.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचा वसा घेत व्यावसायिक...घोडेगाव (जि. जळगाव) येथील किरण पवार गेल्या तीन...
गांडुळांच्या भरपूर संख्येमुळे माझी शेती...सांगली जिल्ह्यातील बेडग येथील तानाजी नलवडे १५...
सेंद्रिय शेती : जमीन सुपीकता, सापळा... मधापुरी (जि. अकोला) येथील सुधाकर बाणाईत कापूस...
सेंद्रिय हळद, ऊस उत्पादनासह प्रक्रिया...शेतकरी :  निवास लक्ष्मण साबळे, शिवथर, ता. जि...
साताऱ्यात ७ हजार क्विंटल सोयाबीन खरेदीसातारा : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आधारभूत किंमत...
रब्बी पेरणीत बीडची आघाडीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड...
नाशिकला कर्जमाफी याद्या पडताळणीचे ९९...नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी...
मिरची उत्पादनात घटीची शक्यता मुंबई ः गेल्या वर्षी मिरचीला चांगला दर मिळाला...
छत्तीसगडमध्ये दुष्काळस्थितीरायपूर, छत्तीसगड ः छत्तीसगडमधील अनेक भागांत...
जकराया शुगरकडून एकरकमी २५०० रुपये दर सोलापूर ः ऊसदराच्या प्रश्‍नावरून सोलापूर...
शेतकऱ्यांसाठी सत्तेलाही लाथ मारू ः...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : शिवसेनेवर दुतोंडी...
ऊसदरप्रश्नी वांबोरीला काटा बंद अांदोलनराहुरी, जि. नगर : ऊसदरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
बोंडअळीच्या प्रादुर्भावप्रकरणी सहा...अकोला ः जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव...
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी...मुंबई: राज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन...
माजलगांवात उस आंदोलन पेटलेटायरची जाळपोळ, राष्ट्ीय महामार्ग अडविला शेतकरी...
'जेएनपीटी' पथकाकडून ड्रायपोर्टसाठी '...नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर...
पाणीपुरवठा समित्यांवर गुन्हे दाखल कराजळगाव : भारत निर्माण योजनेअंतर्गत राबविण्यात येत...
२०१८ अांतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर... नवी दिल्ली ः बाजरी, ज्वारी, नाचणी या...
कारखान्यांवर साखर विक्रीसाठी दबाव नवी दिल्ली ः कारखान्यांवर साखर विक्रीचा दबाव,...
सोयाबीनची खरेदी खासगी बाजारांतही सुरू...मुंबई : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत...