agriculture news in marathi, Green pepper in Aurangabad 4000 to 5000 rupees per quintal | Agrowon

औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१८) हिरव्या मिरचीची ८८ क्‍विंटल आवक झाली. तिला ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१८) हिरव्या मिरचीची ८८ क्‍विंटल आवक झाली. तिला ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी ७४५ क्‍विंटल कांद्याची आवक झाली. त्याला २०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १२४ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक २६ क्‍विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल, गवारीची २२ क्‍विंटल आवक; तर दर २५०० ते ३५०० रुपये, काकडीची १२१ क्‍विंटल आवक, तर दर ६०० ते ७०० रुपये, भेंडीची २१ क्‍विंटल आवक, तर दर १००० ते २८०० रुपये,  पत्ताकोबीची २१० क्‍विंटल आवक, तर दर ६०० ते ८०० रुपये राहिले. लिंबूची आवक २४ क्‍विंटल झाली. त्यास २००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विटंलचा दर मिळाला. 

मेथीची १५०० जुड्यांची आवक, तर दर १००० ते १२०० रुपये प्रतिशेकडा राहिले. ८ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकला ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. कोथिंबिरीच्या १७ हजार जुड्यांची आवक झाली. तिला ७०० ते ९०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. २७ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३० क्‍विंटल आवक झालेल्या आंब्याचे दर २५०० ते ७५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. पपईची ७ क्‍विंटल आवक, तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल, दुधी भोपळ्याची १८ क्‍विंटल आवक; तर दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३३ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

कैरीची आवक २०३ क्‍विंटल; तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याला ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मोसंबीची ३५ क्‍विंटल आवक; तर दर १२०० ते ३२०० रुपये, डाळिंबाची ३७ क्‍विंटल आवक, तर दर ३०० ते १६०० रुपये, संत्र्याची आवक २२ क्‍विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये, टरबुजाची १८९ क्‍विंटल आवक; तर दर ८०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाला. खरबूजची आवक २५५ क्‍विंटल झाली. त्यास ८०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७०० क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षांना ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...