agriculture news in marathi, Green pepper in Aurangabad for Rs. 2000 to Rs. 3600 per quintal | Agrowon

औरंगाबादेत हिरवी मिरची २००० ते ३६०० रुपये प्रतिक्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 एप्रिल 2019

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची १३७ क्‍विंटल आवक झाली. तिला २००० ते ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची १३७ क्‍विंटल आवक झाली. तिला २००० ते ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ७६८ क्‍विंटल आवक झाली. त्याला २५० ते ७५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर २०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३९ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २० क्‍विंटल आवक झालेल्या गवारचे दर २००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४८ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वालशेंगांची आवक ३ क्‍विंटल, तर दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १० क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

लिंबाची आवक १५ क्‍विंटल, तर दर २००० ते ३५०० रुपये, कारल्याची आवक ५ क्‍विंटल, तर दर ४००० ते ५५००, पत्ता कोबीची आवक १८७ क्‍विंटल, तर दर ७०० ते १०००, फ्लॉवरची आवक ५८ क्‍विंटल, तर दर १५०० ते २२००, ढोबळ्या मिरचीची आवक १८ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३५००, शेवग्याची आवक ३२ क्‍विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५८ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कैरीची आवक ३१० क्‍विंटल, तर दर १२०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या दिलपसंदला १५०० ते २००० रुपये प्रतक्‍विंटलचा दर मिळाला. 

३० क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६५ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. द्राक्षाची आवक १२२ क्‍विंटल, तर दर ३००० ते ५००० रुपये, पपईची आवक १३० क्‍विंटल, तर दर ३०० ते ५०० रुपये, लालबाग व बदाम आंब्याची २० क्‍विंटल आवक, तर दर ५००० ते ८०००, टरबूज किरणची आवक ४५५ क्‍विंटल, तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाला. 

१७ क्‍विंटल आवक झालेल्या संत्राला २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ क्‍विंटल आवक झालेल्या चिंचेचे दर ३००० ते ७५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीचे दर १००० ते १७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. ६५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकला ३०० ते ८०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ९५०० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ५०० ते १९००...अकोल्यात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये अकोला ः...