agriculture news in Marathi, Gross chili Rs. 650-3000 in Solapur | Agrowon

सोलापुरात ढोबळी मिरची प्रतिक्विंटल ६५० ते ३००० रुपये
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी (ता. २) ढोबळी मिरचीला किमान ६५० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि कमाल ३००० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीची १० क्विंटल आवक होती. ढोबळी मिरची, वांगी, कोबीची आवक काहीशी कमीच राहिली, पण मागणी असल्याने त्यांचे दर स्थिर राहिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी (ता. २) ढोबळी मिरचीला किमान ६५० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि कमाल ३००० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीची १० क्विंटल आवक होती. ढोबळी मिरची, वांगी, कोबीची आवक काहीशी कमीच राहिली, पण मागणी असल्याने त्यांचे दर स्थिर राहिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात शनिवारी वांग्याची २० ते ३० क्विंटल आवक राहिली. ही सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ४५० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि कमाल १५०० रुपये दर होता. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत त्यांची आवक आणि दरही काहीसे स्थिरच आहेत, तर कोबीची २० ते ३५ क्विंटल आवक झाली. कोबीला किमान ६०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय गाजर, काकडीलाही चांगला उठाव मिळाला. 

अलीकडच्या पंधरवड्यात त्यांच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून येते. शनिवारीही मात्र बऱ्यापैकी दर मिळाला. गाजराला प्रतिक्विंटलला किमान ३०० ते ९०० रुपये आणि काकडीला किमान ६०० ते २५०० रुपये असा दर आहे. गाजराची आवक १५० क्विंटल आणि काकडीची आवक १० ते २० क्विंटलपर्यंत राहिली. 

हिरव्या मिरचीची आवक २० ते ३० क्विंटलपर्यंत झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि कमाल ३००० रुपये मिळाला. भाजीपाल्यातील चढ-उतार मात्र कायम राहिला. मेथी, कोथिंबिर आणि शेपूची आवक प्रत्येकी १० ते २० हजार पेंढ्यांपर्यंत झाली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते ६५० रुपये, कोथिंबिरीला ५०० ते ७०० रुपये आणि शेपूला ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
जळगाव : कांदा दरात किंचित सुधारणा,...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३९०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
चिंचेचे दर दबावातसरुड, जि. कोल्हापूर : खुटाळवाडी (ता. शाहूवाडी)...
जळगावात गवार, हिरवी मिरची तेजीतजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडी १२०० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३००० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ४०० ते ३०००...नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये नाशिक :...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २८५० ते ३६३०...सांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक कमी...
परभणी बाजार समितीमध्ये कापूस दरात...परभणी ः कापूस खरेदी हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ५०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत मंगळवारी टोमॅटोची...
गहू दरांवर दबाव, मका दरात वाढ शक्‍यजळगाव ः खानदेशातील मोजक्‍याच बाजार समित्यांमध्ये...
कळमणा बाजारात गव्हाची आवक २५०० क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत गव्हाची वाढती आवक...
बोरी बाजार समितीत हळदखरेदीस प्रारंभबोरी, जि. परभणी ः बोरी (ता. जिंतूर) येथील कृषी...
दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची २००० ते ३६००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत मेथी प्रतिशेकडा ४०० ते ५०० रुपयेपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
जळगाव जिल्ह्यात भेंडीच्या आवकेत वाढ, दर...जळगाव : भेंडीची आवक वाढत आहे. उठाव कायम असल्याने...