agriculture news in marathi, Ground water level decreases in Pune division | Agrowon

पुणे विभागात भूजलपातळी खालावली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

पुणे ः पावसाळ्यात पडलेला पावसाच्या खंडाचा परिणाम भूजलपातळीवर झाला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून येत्या उन्हाळ्यात पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांतील दोन हजार २५८ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यापैकी २७ तालुक्यांतील ६६४ गावांमध्ये आॅक्टोबरपासून भीषण पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. आत्तापासून सरकारला पाणी टंचाई कमी करण्यासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहे.

पुणे ः पावसाळ्यात पडलेला पावसाच्या खंडाचा परिणाम भूजलपातळीवर झाला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून येत्या उन्हाळ्यात पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांतील दोन हजार २५८ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यापैकी २७ तालुक्यांतील ६६४ गावांमध्ये आॅक्टोबरपासून भीषण पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. आत्तापासून सरकारला पाणी टंचाई कमी करण्यासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहे.

पुणे विभागातील जून ते सप्टेंबर महिन्यातील पडलेल्या पावसाचा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने तुलनात्मक अभ्यास केला. त्यामध्ये विभागातील एकूण ५७ तालुक्यांपैकी दहा तालुक्यांत ०-२० टक्के घट आढळून आली असल्याचे दिसून आले. तर पाच तालुक्यांत २०-३० टक्के, १३ तालुक्यांत ३० ते ५० टक्के घट आढळून आली. तर १४ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आढळून आली.

तसेच १५ तालुक्यांत पाऊस झाला नसल्याचे चित्र समोर आले आहे. भूजलपातळीत शून्य ते एक मीटरने घट आढळून आलेल्या गावात पाणीटंचाईची शक्यता कमी असून, ती नियंत्रित ठेवण्यासारखी असते. शासन निर्णयातील निकषानुसार पर्जन्यमानामध्ये वीस टक्क्यांपेक्षा कमी तूट असलेल्या गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता नसते. मात्र, पडलेल्या पावसाचा अभ्यास केल्यास विभागातील बहुतांशी तालुक्यात पावसाने सरासरीही गाठली नसल्याचे आढळून येते.

विहिरींच्या नोंदी ठरल्या महत्त्वाच्या
जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे भूजलपातळी किती वाढली यांचे सर्वेक्षण भूजल विकास यंत्रणा करते. यंदाही विभागातील स्थिर भूजलपातळीच्या पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरीच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या. त्या निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीचा मागील पाच वर्षांतील आॅक्टोबर महिन्यातील सरासरी भूजलपातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार विभागातील एकूण ५७ तालुक्यांपैकी ४४ तालुक्यांतील दोन हजार २५८ गावांत भूजलपातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली आहे. तर ७२२ गावांमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त, ६३३ गावांमध्ये दोन ते तीन मीटर, ९०३ गावांमध्ये एक ते दोन मीटर एवढी घट आढळून आली असल्याचे दिसले.

जिल्हानिहाय भूजलपातळीत तूट असलेली गावांची संख्या
जिल्हा ३ मीटरहून अधिक
मीटरपर्यंत

मीटरपर्यंत
१ मीटरहून अधिक
पुणे १५२ १६३ २६२ ५७७
सोलापूर ३७१ २८१ २९७ ९४९
कोल्हापूर
सांगली १३६ ११४ १६२ ४१२
सातारा ६३ ७५ १७९ ३१७
पुणे ७२२ ६३३ ९०३ २२५८

कोकण आणि विदर्भाच्या पूर्व पट्ट्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे भूजलपातळीत वाढ झाली. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाचा पश्चिम पट्ट्यातील काही जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरवल्यामुळे भूजलपातळी वाढली नसल्याचे अभ्यासाअंती दिसून आले. येत्या उन्हाळ्यात या भागात चांगलीच पाणीटंचाई जाणवेल. त्यासाठी या भागातील नागरिकांनी पाण्याचा कमी वापर करण्याची गरज आहे.
- शेखर गायकवाड, संचालक, भूजल सर्वेक्षण, विकास यंत्रणा, पुणे

इतर बातम्या
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...