agriculture news in marathi, ground water level increase, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यामधील सर्वच तालुक्‍यांतील भूजलपातळी वाढली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 एप्रिल 2018

जलयुक्त शिवार अभियानासह लोकसहभागातून जिल्ह्यात जलसंधारणाची चांगली कामे होत आहेत. या कामांना रोजगार हमी योजनेची जोड दिली जाणार आहे. जलसंधारण कामांमुळे जिल्ह्यातील भूजलपातळीत वाढ झाली आहे. अडवलेले पाणी जिरण्याला मदत झाल्याने यंदा टंचाईची तीव्रता तुलनेत कमी जाणवणार आहे. जलसंधारण कामांमुळे अनेक गावांची टॅंकरमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

- संजय पाटील, उपजिल्हाधिकारी, सातारा.

 
सातारा  ः जलयुक्त शिवार योजना, मनरेगासह अन्य योजनांतून केलेली जलसंधारणाची कामे तसेच परतीचा दमदार झालेला पाऊस, यामुळे यंदा सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांतील भूजलपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पाणीटंचाईची झळ कमी बसत असून, टॅंकरच्या संख्येतही घट झाली आहे. 
 
मागील पाच वर्षांच्या मार्चमधील सरासरी भूजलपातळीचा विचार करता सर्वच तालुक्‍यांतील पाणीपातळी वाढली आहे. विशेषतः दुष्काळी माण व खटाव तालुक्‍यात यंदा भूजलपातळीत एक मीटरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारण कामांचे फलित आता दिसू लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईची धग कमीच झाली आहे.
 
भूजल सर्वेक्षण विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील ५० पाणलोट क्षेत्रात १०६ निरीक्षण विहिरी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. या विहिरींमधील पाणीपातळीची मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाहणी करण्यात आली. त्यानुसार सर्वच तालुक्‍यात भूजलपातळीत वाढ झाली आहे. १०६ पैकी ८४ विहिरींतील पाणीपातळी वाढ झाल्याचे आढळले आहे. दुष्काळी तालुक्‍यासह इतर तालुक्‍यांत चांगला पाऊस झाल्याने पातळीत वाढ झाली.

भूजलपातळीत तालुकानिहाय झालेली वाढ (मीटर) ः खंडाळा १.३९, खटाव १.६३, कोरेगाव १.२१, माण १.३३, वाई १.१२, महाबळेश्‍वर ०.३३, पाटण ०.१४, फलटण ०.४०, सातारा ०.२१, जावळी ०.६४, कऱ्हाड ०.३४.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...