खानदेशात भुईमूग पीक जेमतेम

खानदेशात भुईमूग पीक जेमतेम
खानदेशात भुईमूग पीक जेमतेम

जळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे क्षेत्र या हंगामात फक्त एक हजार हेक्‍टरपर्यंतच आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भागातील हे पारंपरिक पीक पाणीटंचाईचा फटका बसू लागल्याने नामशेष होण्याच्या स्थितीत येईल की काय? अशी शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. 

चोपडा, यावल, शिरपूर, शहादा, तळोदा हा भाग भुईमूग पेरणीसाठी प्रसिद्ध आहे. हा भाग सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे. या पायथ्यावरील गावांमधील पारंपरिक पीक म्हणून भुईमुगाची ओळख आहे. यावलमधील किनगाव, विरावली, कोरपावली, वड्री, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रूक, चोपड्यातील अडावद, धानोरा, मोहरद, वरगव्हाण, नारोद, खरद, मंगरूळ, वर्डी, लासूर, वेळोदा, आडगाव, माचले, खर्डी, पंचक, लोणी, तापी काठावरील गोरगावले, सनपुले, धनवाडी, कठोरा, शिरपूरमधील तोंदे, बळळाज, तरडी, भावेर, तऱ्हाडी, शहादामधील बामखेडा, तोरखेडा, जयनगर, मोहिदे, काथर्दे, तळोदामधील प्रतापपूर, मोड, आमलाड, बोरद आदी भागात भुईमुगाची पेरणी केली जाते. 

जळगावमधील पाचोरा, चाळीसगाव, मुक्ताईनगरातही कमी अधिक क्षेत्रात पेरणी केली जाते. पण पाण्याचे संकट सातपुड्यालगत वाढले. या भागातील अनेर व गूळ प्रकल्पही १०० टक्के भरले नाहीत. नदी-नाले खळाळून वाहून निघाले नाहीत. यामुळे चोपडा, यावल, शहादा भागात टंचाई स्थिती आहे. 

तळोदा भागात स्थिती बरी आहे. परिणामी भुईमुगाचे क्षेत्र यंदा सुमारे दोन हजार हेक्‍टरने कमी झाले आहे. ते एक हजार हेक्‍टरपर्यंतच आहे. उत्पादनासह भुईमुगाचा चाराही यंदा कमी मिळेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com