agriculture news in marathi, groundnut seed production programme, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात १२ हजार हेक्‍टरवर भुईमूग बीजोत्पादन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018
नगर  ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियानामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. या अभियानातून नगर जिल्ह्यामध्ये ११ हजार ८०० हेक्‍टर क्षेत्रावर भुईमुगाचे उन्हाळी बीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी चौदा तालुक्‍यांत ५ हजार ९२९ क्‍विंटल अनुदानावर बियाणे वितरण केले असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
 
नगर  ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियानामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. या अभियानातून नगर जिल्ह्यामध्ये ११ हजार ८०० हेक्‍टर क्षेत्रावर भुईमुगाचे उन्हाळी बीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी चौदा तालुक्‍यांत ५ हजार ९२९ क्‍विंटल अनुदानावर बियाणे वितरण केले असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
 
तेलबियांचे उत्पादन वाढावे, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियानामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. त्यासाठी ‘एसबी-२ व टीएजी- २४’ बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जाणार आहेत. एका एकरासाठी पेरणीला चाळीस किलो बियाणे लागत असले, तरी ग्राम बीजोत्पादनासाठी दिले जाणारे बियाणे टोकन पद्धतीने वापरायचे आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला एका एकरासाठीच वीस किलो बियाण्यांवर अनुदान मिळेल. 
 
राज्यभरातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये ‘एसबी-२’चे ५ हजार नऊशे २० क्विंटल तर ‘टीएजी-२४’चे पंधरा हजार २२८ क्विंटल, असे २१ हजार १८४ क्विंटल बियाणे महाबीजने पुरवले आहे. सर्वासाठी बियाणे उपलब्ध असले तरी अल्प, अत्यंल्प भूधारक, अनुसूचित जाती-जमाती, महिला यांना प्राधान्य दिले जात आहे.
 
राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये २१ हजार हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाचे बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. त्यासाठी २१ हजार १४८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा केला आहे. एका शेतकऱ्याला एका एकरापर्यंत (वीस किलो) बियाणे साठ टक्के अनुदानावर दिले जाणार आहेत.
 
राज्यात सर्वाधिक क्षेत्र नेहमीप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अकरा हजार आठशे ५८ हेक्‍टर क्षेत्रावर हा उपक्रम राबवला जात आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, तंत्र अधिकारी अशोक संसारे यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...