agriculture news in marathi, groundwater level decreased in Marathwada, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात भूजल पातळीत मोठी घट
संतोष मुंढे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच भूजल पातळीनेही जलसंकट ओढावण्याचे संकेत दिले आहेत. एकूण ७६ पैकी ५६ तालुक्‍यांत मागील पाच वर्षांच्या तुलनेत नोंदली गेलेली घट दुष्काळाची दाहकता दर्शवित आहे. त्यामुळे भूगर्भातही उपलब्ध पाण्याचा वापर अतिशय काटेकोरपणे केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचेच स्पष्ट होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भूजल पातळीत ७.३८ मीटरची घट नोंदली गेली आहे. 

औरंगाबाद : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच भूजल पातळीनेही जलसंकट ओढावण्याचे संकेत दिले आहेत. एकूण ७६ पैकी ५६ तालुक्‍यांत मागील पाच वर्षांच्या तुलनेत नोंदली गेलेली घट दुष्काळाची दाहकता दर्शवित आहे. त्यामुळे भूगर्भातही उपलब्ध पाण्याचा वापर अतिशय काटेकोरपणे केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचेच स्पष्ट होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भूजल पातळीत ७.३८ मीटरची घट नोंदली गेली आहे. 

यंदा मराठवाड्यात जून ते सप्टेंबर २०१८ दरम्यान सरासरी ६६६.४ मिलिमिटर पावसाच्या तुलनेत ६०५.५ मिलिमिटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सरासरी ३३०.५३ मिलिमिटरच पाऊस पडला. अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत सरासरी २७५ मिलिमिटर पाऊस कमी पडला. सरासरी ४५.४ टक्‍के घट पावसात नोंदली गेली.

याचा थेट परिणाम भूजलपातळीवर झाल्याचे दिसते आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने सप्टेबरअखेर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ८७६ विहिरींचे निरीक्षण घेतले. या निरीक्षणाअंती औरंगाबाद जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी १.७३ मीटरची घट नोंदली गेली. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात २.०४ मीटर, बीड जिल्ह्यात २.०७ मीटर, लातूर जिल्ह्यात १.१५ मीटरपर्यंत तर उस्मनाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४.०१ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदली गेली आहे.

नांदेड जिल्ह्यात ०.४१ मीटर, परभणीत ०.०९ मीटर तर हिंगोली जिल्ह्यात ०.२० मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदली गेली आहे. सर्वाधिक पावसाचे प्रमाण राहिलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्‍यातील भूजल पातळीत १.७९ मीटरची घट नोंदली गेली आहे. नांदेडमधीलच धर्माबाद तालुक्‍यातील भूजल पातळीतही १.१६ मीटर तर मुखेड तालुक्‍यातील भूजल पातळीत २.३३ मीटरपर्यंत घट नोंदली गेली आहे. 

निरीक्षणासाठी घेतलेल्या विहिरींची जिल्हानिहाय संख्या 
औरंगाबाद -१४१ 
जालना-११० 
परभणी-८७ 
हिंगोली-५५ 
नांदेड-१३४ 
लातूर-१०९ 
उस्मानाबाद-११४ 
बीड-१२६ 

तालुकानिहाय पाणीपातळीतील घट 
पातळी - तालुके

० ते १ मीटर - १६ 
१ ते २ मीटर - २२ 
२ ते ३ मीटर - ७ 
३ मीटरपेक्षा जास्त -११ 
सरासरी पातळी - २०

अशी आहे तालुकानिहाय अपेक्षित पावसाच्या तुटीची अवस्था 
पातळी - तालुके
२० टक्‍के तूट ः ११ 
२० ते ३० टक्‍के तूटः १४ 
३० ते ५० टक्‍के तूटः ३८
५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तूटः ८
सरासरी पेक्षा जास्त पाऊस ः ५  

 या तालुक्यात नोंदली घट
भूजल पातळीत वाढ नोंदल्या गेलेल्या तालुक्‍यात परभणी जिल्ह्यातील पालम, पूर्णा, परभणी, पाथ्री, जिंतूर, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, हिमायतनगर, नांदेड, अर्धापूर, भोकर, कंधार, लोहा, मुदखेड, उमरी, माहूर व लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्‍याचा समावेश आहे. 

० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदलेले तालुके 
सोयगाव, मंठा, सोनपेठ, गंगाखेड, मानवत, कळमनुरी, सेनगाव, बिलोली, नायगाव, अहमदपूर, चाकूर, देवणी, निलंगा, बीड, आष्टी, परळी 

१ ते २ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदलेले तालुके 
औरंगाबाद, पैठण, खुलताबाद, कन्नड फुलंब्री, जालना, बदनापूर, जाफ्राबाद, घनसावंगी, सेलू, देगलूर, धर्माबाद, शिरूर, लातूर, उदगीर, रेणापूर, औसा, भूम, पाटोदा, वडवणी, केज अंबाजोगाई. 

२ ते ३ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदलेले तालुके 
सिल्लोड, वैजापूर, गंगापूर, परतूर, मुखेड, कळंब, गेवराई. 

३ मीटरपेक्षा जास्त भूजल पातळीत घट नोंदलेले तालुके 
भोकरदन, अंबड, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, परंडा, शिरूर कासार, धारूर, माजलगाव. 
 

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...