भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोल

भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोल
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोल

भंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत २५४.३३ मिलिमीटर कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे तीन तालुक्‍यांतील भूजल पातळी सरासरी ०.२० मीटरने खोलवर गेली आहे. यामुळे जवळपास ३० गावांना पाणीटंचाईचे चटके बसणार आहेत. 

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १२८०.०३ मिलिमीटर आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत १०२५.७० मिमी पर्जन्यमान झाले. मागील चार वर्षांत पर्जन्यमानात साधारणत: २८ टक्के घट झाली. यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे सरासरी २० टक्के घट झाल्याने तीन तालुक्‍यांत तीव्र पाणीटंचाईची छाया गडद होत आहे. मागील पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी २.५२ मीटर आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याची सरासरी पातळी २.४७ मीटर आहे. त्यात ०.०५ मीटरने वाढ झाली. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी या तालुक्‍यांची सरासरी ० ते १ मीटरने वाढली. परंतु, साकोली, पवनी व लाखांदूर तालुक्‍याची भूजल पातळी ०.२० मीटरने खोलवर गेली. परिणामी, साकोलीतील १३ गावे, पवनीतील १० व लाखांदूर तालुक्‍यातील सात गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

मागील काही वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होत असल्याने उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही तशीच परिस्थिती आहे. प्रशासनातर्फे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

तालुका  पाच वर्षांतील सरासरी पातळी (मीटर) सप्टेंबरची भूजल पातळी (मीटर) तफावत (मीटर)  
भंडारा ३.३८ ३.१३ ०.२५
मोहाडी २.३१  २.०५  ०.२६
तुमसर २.५६ २.३९ ०.१७ 
साकोली १.८४ २.०४ ०.२० 
लाखनी १.८५ १.५८ ०.२६ 
पवनी ४.०१ ४.२१   ०.१९
लाखांदूर १.७१ १.९२ ०.२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com