agriculture news in marathi, Grow Prices The price of the coconut is stable | Agrowon

नागपूरात मुगाच्या दरात वाढ; मोसंबीचे दर स्थिर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

नागपूर ः कळमणा बाजार समितीत भुसारमालाचे दर कमी होत असल्याचे चित्र आहे; परंतु गेल्या आठवड्यापासून जेमतेम आवक असलेल्या मुगाच्या दरात मात्र वाढ नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात ३९०० ते ४१०० रुपये क्‍विंटल असलेल्या मुगाचे दर ४००० ते ४३०० रुपये क्‍विंटलवर पोचले. मुगाची आवक ३ ते १९ क्‍विंटल अशी आहे.

नागपूर ः कळमणा बाजार समितीत भुसारमालाचे दर कमी होत असल्याचे चित्र आहे; परंतु गेल्या आठवड्यापासून जेमतेम आवक असलेल्या मुगाच्या दरात मात्र वाढ नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात ३९०० ते ४१०० रुपये क्‍विंटल असलेल्या मुगाचे दर ४००० ते ४३०० रुपये क्‍विंटलवर पोचले. मुगाची आवक ३ ते १९ क्‍विंटल अशी आहे.

बाजारात तुरीची आवक ३५० क्‍विंटलची सरासरी आवक आहे. गेल्या आठवड्यात तूर ३४५० ते ३७३० रुपये क्‍विंटल होती. या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण होत हे दर ३४०० ते ३७१५ रुपये क्‍विंटलवर आले. तुरीची आवकदेखील घटल्याचे सांगण्यात आले. आठवड्यात तुरीची आवक ३५० वरून २५० क्‍विंटलवर पोचली. ३००० ते ३२७४ रुपये क्‍विंटल हरभरा दर होते. या आठवड्यात हे दर ३००० ते ३३३५ रुपयांवर पोचले. हरभरा दरात किरकोळ वाढ नोंदविण्यात आली. ९०० ते १००० क्‍विंटल अशी हरभऱ्याची आवक आहे.

लुचई तांदूळ २२०० ते २५०० रुपयांवर गेल्या पंधरवड्यापासून स्थिर असून आवक २५ ते ३० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे. उडदाची ६ क्‍विंटलची आवक होत दर ३८००  ते ४००० रुपये क्‍विंटल राहिले. बाजारात जवसाचीदेखील आवक होत असून ती ६ ते ८ क्‍विंटलच्या घरात आहे. जवसाचे व्यवहार ३८०० ते ४००० रुपये क्‍विंटलने झाले. सोयाबीनची बाजारातील नियमित आवक आहे. सोयाबीनची कधी १००, तर कधी ५०० क्‍विंटलची आवक नोंदविली जाते. ३००० ते ३३७५ रुपये क्‍विंटल असलेले सोयाबीन या आठवड्यात ३२०० ते ३४५२ रुपये क्‍विंटलवर पोचले.

मोसंबीची नियमित आवक
कळमणा बाजार समितीत मोसंबीची आवक नियमित आहे. मोसंबीच्या मोठ्या आकाराचे फळाचे दर ३००० ते ४००० रुपये क्‍विंटलवर स्थिर आहेत. मध्यम आकाराच्या फळाचे दर २४०० ते २८०० रुपये, तर लहान आकाराच्या फळांना १२०० ते १४०० रुपये क्‍विंटलचा दर होता. बाजारात डाळिंबाचे व्यवहार २००० ते ६००० रुपये क्‍विंटलने होत आहेत. डाळिंबाची आवक ५०० ते ५५० क्‍विंटलची आहे.

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...