agriculture news in marathi, Grow Prices The price of the coconut is stable | Agrowon

नागपूरात मुगाच्या दरात वाढ; मोसंबीचे दर स्थिर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

नागपूर ः कळमणा बाजार समितीत भुसारमालाचे दर कमी होत असल्याचे चित्र आहे; परंतु गेल्या आठवड्यापासून जेमतेम आवक असलेल्या मुगाच्या दरात मात्र वाढ नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात ३९०० ते ४१०० रुपये क्‍विंटल असलेल्या मुगाचे दर ४००० ते ४३०० रुपये क्‍विंटलवर पोचले. मुगाची आवक ३ ते १९ क्‍विंटल अशी आहे.

नागपूर ः कळमणा बाजार समितीत भुसारमालाचे दर कमी होत असल्याचे चित्र आहे; परंतु गेल्या आठवड्यापासून जेमतेम आवक असलेल्या मुगाच्या दरात मात्र वाढ नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात ३९०० ते ४१०० रुपये क्‍विंटल असलेल्या मुगाचे दर ४००० ते ४३०० रुपये क्‍विंटलवर पोचले. मुगाची आवक ३ ते १९ क्‍विंटल अशी आहे.

बाजारात तुरीची आवक ३५० क्‍विंटलची सरासरी आवक आहे. गेल्या आठवड्यात तूर ३४५० ते ३७३० रुपये क्‍विंटल होती. या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण होत हे दर ३४०० ते ३७१५ रुपये क्‍विंटलवर आले. तुरीची आवकदेखील घटल्याचे सांगण्यात आले. आठवड्यात तुरीची आवक ३५० वरून २५० क्‍विंटलवर पोचली. ३००० ते ३२७४ रुपये क्‍विंटल हरभरा दर होते. या आठवड्यात हे दर ३००० ते ३३३५ रुपयांवर पोचले. हरभरा दरात किरकोळ वाढ नोंदविण्यात आली. ९०० ते १००० क्‍विंटल अशी हरभऱ्याची आवक आहे.

लुचई तांदूळ २२०० ते २५०० रुपयांवर गेल्या पंधरवड्यापासून स्थिर असून आवक २५ ते ३० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे. उडदाची ६ क्‍विंटलची आवक होत दर ३८००  ते ४००० रुपये क्‍विंटल राहिले. बाजारात जवसाचीदेखील आवक होत असून ती ६ ते ८ क्‍विंटलच्या घरात आहे. जवसाचे व्यवहार ३८०० ते ४००० रुपये क्‍विंटलने झाले. सोयाबीनची बाजारातील नियमित आवक आहे. सोयाबीनची कधी १००, तर कधी ५०० क्‍विंटलची आवक नोंदविली जाते. ३००० ते ३३७५ रुपये क्‍विंटल असलेले सोयाबीन या आठवड्यात ३२०० ते ३४५२ रुपये क्‍विंटलवर पोचले.

मोसंबीची नियमित आवक
कळमणा बाजार समितीत मोसंबीची आवक नियमित आहे. मोसंबीच्या मोठ्या आकाराचे फळाचे दर ३००० ते ४००० रुपये क्‍विंटलवर स्थिर आहेत. मध्यम आकाराच्या फळाचे दर २४०० ते २८०० रुपये, तर लहान आकाराच्या फळांना १२०० ते १४०० रुपये क्‍विंटलचा दर होता. बाजारात डाळिंबाचे व्यवहार २००० ते ६००० रुपये क्‍विंटलने होत आहेत. डाळिंबाची आवक ५०० ते ५५० क्‍विंटलची आहे.

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
भाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...
परभणीत दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
नागपुरात बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ८)...
औरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरला वांगे १००० ते ३५०० रुपये...नगर ः नगर बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १५...
जळगावात वांगे प्रतिक्विंटल १००० रुपयेजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
कोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे`सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे नाशिक : पावसाळी वातावरणात साठवणुकीतील कांदा खराब...
केळी दर स्थिर; अर्ली कांदेबाग आवक वाढलीजळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील...