agriculture news in marathi, growing heat affect on sugarcane cutting, kolhapur, maharahtra | Agrowon

वाढत्या उन्हामुळे कोल्हापुरातील ऊसतोडणी यंत्रणेवर परिणाम
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018
कोल्हापूर  : ऊस गाळप हंगाम हळूहळू अंतिम टप्प्याकडे जात आहे. सगळ्यात महत्त्वाच्या या टप्प्यात आता कारखाने मजूरटंचाईने बेहाल होत असल्याचे चित्र आहे. शिल्लक राहिलेला ऊस आणि मजूर टोळ्यांची कमतरता यामुळे ऊसतोडणीला गतीच नसल्याची स्थिती आहे.
 
गेल्या चार दिवसांपासून उन्हाचे प्रमाण वाढू लागल्याने आता मजुरांची क्रयक्षमता घटण्याची शक्‍यता असल्याने वाढता उन्हाळा हे एक आणखी संकट कारखाना व्यवस्थापनापुढे उभे राहिले आहे. कोल्हापूर विभागातील हंगाम पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक आटोपला आहे. 
 
कोल्हापूर  : ऊस गाळप हंगाम हळूहळू अंतिम टप्प्याकडे जात आहे. सगळ्यात महत्त्वाच्या या टप्प्यात आता कारखाने मजूरटंचाईने बेहाल होत असल्याचे चित्र आहे. शिल्लक राहिलेला ऊस आणि मजूर टोळ्यांची कमतरता यामुळे ऊसतोडणीला गतीच नसल्याची स्थिती आहे.
 
गेल्या चार दिवसांपासून उन्हाचे प्रमाण वाढू लागल्याने आता मजुरांची क्रयक्षमता घटण्याची शक्‍यता असल्याने वाढता उन्हाळा हे एक आणखी संकट कारखाना व्यवस्थापनापुढे उभे राहिले आहे. कोल्हापूर विभागातील हंगाम पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक आटोपला आहे. 
 
सध्या बहुतांशी ठिकाणी खोडवा उसाची तोड सुरू आहे. परंतु केवळ साठ टक्केच ऊसतोडणी कामगार उपलब्ध असल्याने याचा प्रतिकूल परिणाम यंदाच्या हंगामावर स्पष्टपणे दिसून येत आहे. याचा ताण तोडणी यंत्रणेवर पडताना दिसतो. कारखान्याच्या अध्यक्षांपासून ते फिल्डमनपर्यंतच्या सर्व यंत्रणा लवकरात लवकर ऊस तोडणी कशी करता येईल याच प्रयत्नात आहे. 
 
अनेक कारखान्यांनी कमी मनुष्यबळाच्या पार्श्‍वभूमीवर तोडणी प्रतिनिधींच्या बैठक घेतल्या असून शिल्लक ऊस, उपलब्ध तोडणी यंत्रणा याचा अंदाज घेण्यात येत आहे.  
कारखान्यांनी हंगामाच्या सुरवातीला झालेल्या बैठकीत यंदा उसाचे उत्पादक कमी असेल असा अंदाज व्यक्त केला. यामुळे जरी यंत्रणा कमी उपलब्ध असली तरी यंदाचा हंगाम फारसा अडचणीचा ठरणार नाही अशी शक्‍यता होती.
 
परंतु, मध्यंतरीच्या पावसामुळे उसाच्या वजनात अनपेक्षित वाढ झाल्याने कारखान्यांचे गणित चुकले. त्याचा फटका अजूनही बसत आहे. अजूनही बऱ्याच कारखान्यांकडे तोडणी यंत्रे नाहीत. आणि जी आहेत ती लहान क्षेत्रावर उपयोगात येणारी नाहीत. परिणामी यंदाच्या हंगामात तरी तोडणी यंत्राचा वापर अधिक प्राधान्य देऊन करण्यात कारखान्यांना अपयश येत असल्याची स्थिती आहे. 

ऊसतोडणी कामगार कमी असल्याने वेळेत तोड होत नसल्याने शेतकऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे. कारखान्यांनी दिलेली तोडणीची तारीख पुढे जात असल्याने उत्पादकांचे पिकांचे वेळापत्रक कोलमडत आहे. वेळेत तोडणी हवी असेल तर पैसे द्या अशी थेट मागणीच होत असल्याने उसाची वेळेत तोड करण्यासाठी पैसे देण्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे उत्पादकांनी सांगितले. यामुळे कसेही करून आपला उस कारखान्याला जावा याच प्रयत्नात सध्या ऊस उत्पादक आहे.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...