जळगाव जिल्ह्यात मूग, उडदाच्या दरात सुधारणा

जळगाव जिल्ह्यात मूग, उडदाच्या दरात वाढ
जळगाव जिल्ह्यात मूग, उडदाच्या दरात वाढ

जळगाव : जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी पूर्ण होताच मूग व उडदाच्या दरात किरकोळ सुधारणा झाली. मुगाचे दर क्विंटलमागे ६० ते १०० व उडदाचे दरही क्विंटलमागे ५० ते ८० रुपयांनी वाढले आहेत.

मुगाची आवक बाजार समित्यांमध्ये कमी झाली आहे. मुगाला प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर आहेत. १० दिवसांपूर्वी ४००० ते ४९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. लालसर, कमी दर्जाच्या मुगाची खरेदी ३६०० रुपयांपासून केली जात होती. उडदाचे दरही ४००० ते ४८०० रुपये होते. सध्या ४१०० ते ४८५० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. क्‍लीनिंग, ग्रेडिंग केलेल्या दर्जेदार उडदाला ५१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर आहेत. उडदाची आवक जळगाव, चोपडा, पाचोरा व अमळनेर येथील बाजारात स्थिर आहे. जिल्ह्यात प्रमुख बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन १२०० क्विंटलपर्यंत उडदाची आवक होत आहे; तर मुगाची आवक मात्र फारशी नाही. यावल, चोपडा, अमळनेर येथील बाजारात आवक बरी आहे. तेथे प्रतिदिन मिळून ४०० क्विंटलपर्यंतची आवक होत आहे. मुगाची आवक पुढील १० ते १२ दिवसांत आणखी कमी होईल. कारण यंदा मुगाचे अपेक्षित उत्पादन नाही.

उडदाचे दर वाढत असल्याने काही शेतकऱ्यांनी त्याची विक्री करणे टाळले आहे. त्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरू होतील, असे संकेत मिळताच दर किरकोळ वधारले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com