जीएसटी, अनुदान कपातीचा शेतकऱ्यांना फटका

जीएसटी, अनुदान कपातीचा शेतकऱ्यांना फटका
जीएसटी, अनुदान कपातीचा शेतकऱ्यांना फटका

रत्नागिरी ः बारा ते अठरा टक्के जीएसटी आणि अनुदान कपात यामुळे कृषी अवजारे योजनांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. जीएसटी कमी करावा आणि अनुदानाच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी आता शेतकरी आणि कृषी पूरक संस्थांकडून होऊ लागली आहे.

कृषी यांत्रिकीकीरण योजनेतून शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठी अनुदान दिले जाते. चालू आर्थिक वर्षासाठी (२०१९-२०) पाऊण कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेत तीन अश्वशक्ती व पाच अश्वशक्ती विद्युत पंप, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप यासाठी अनुदान दिले जाणार आहे. 

कृषी अवजारांवर शून्य ते सहा टक्के व्हॅट होता. मात्र, आता पाच ते अठरा टक्के जीएसटी लागू झाला आहे. ज्या अवजारांवर ६ टक्के व्हॅट होता त्यावर आता १२ टक्के जीएसटी लागू झाला आहे. तीन अश्वशक्ती, पाच अश्वशक्ती, साडेसात अश्वशक्ती तसेच दहा अश्वशक्ती विद्युत पंप, ताडपत्रीला ६ टक्के व्हॅट होता, आता १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे. 

अवजाराच्या किंमतीवर ५ ते १२ टक्के कर वाढला आहे. त्यामुळे जीएसटीचा वाढलेला बोजा शेतकऱ्यांकडून घेऊन आधीच तोकडा खिसा पूर्ण रिता करण्याची तयारी करण्यात आली आहे. या परिस्थितीत कृषी अवजारांच्या योजनांमध्ये यावर्षी अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे जीएसटीच्या बोजाबरोबरच अनुदान कपातीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. 

योजनांमध्ये अनुदानाची रक्कम पूर्ववत केल्यास तसेच कृषी अवजारांना जीएसटी  माफ केल्यास अथवा सरसकट सर्व अवजारांना ५ टक्के जीएसटी आकारल्यास शेतकऱ्यांना या योजनेत दिलासा मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com