agriculture news in marathi, GST, milk producers, society | Agrowon

दूध सोसायट्या, उत्पादकांच्या मानगुटीवर ‘जीएसटी’चे भूत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

जळगाव : दूधदरात लीटरमागे रोज तीन रुपये फटका सहन करणाऱ्या दूध सोसायट्या, उत्पादकांना आता वस्तू व सेवाकर क्रमांक नोंदणी करून मिळविण्याचे सरसकट परिपत्रक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने जारी केले आहे. यामुळे दूध उत्पादक व सोसायट्यांमध्ये खळबळ उडाली, पण लागलीच दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी जे दूध संघाचे तूप खरेदी करतात, त्यांनाच हा जीएसटी क्रमांक संघाला द्यावा लागेल, असे स्पष्टीकरण काही दूध उत्पादकांना दिले. या प्रकारामुळे दूध सोसायट्या व उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

जळगाव : दूधदरात लीटरमागे रोज तीन रुपये फटका सहन करणाऱ्या दूध सोसायट्या, उत्पादकांना आता वस्तू व सेवाकर क्रमांक नोंदणी करून मिळविण्याचे सरसकट परिपत्रक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने जारी केले आहे. यामुळे दूध उत्पादक व सोसायट्यांमध्ये खळबळ उडाली, पण लागलीच दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी जे दूध संघाचे तूप खरेदी करतात, त्यांनाच हा जीएसटी क्रमांक संघाला द्यावा लागेल, असे स्पष्टीकरण काही दूध उत्पादकांना दिले. या प्रकारामुळे दूध सोसायट्या व उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दूध संघाला दूधपुरवठा करणाऱ्या सोसायट्या व गट यांना संघाच्या अधिकाऱ्यांनी मध्यंतरी आपला जीएसटी क्रमांक संघाकडे सादर करा, अशा सूचना दिल्या. त्यासाठी परिपत्रक दिले. यावरून सोशल मीडियावर दूध उत्पादकांनी नाराजी व्यक्त करताच, दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक फक्त दूध संघाचे तूप ज्या सोसायट्या खरेदी करून त्याची ग्राहकांना विक्री किंवा पुरवठा करतात त्यांनाच लागू राहील, असे स्पष्टीकरण दिले, परंतु या परिपत्रकामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे.

तूप खरेदीदारांच्या उलाढालीचे आकडे घ्या
जी सोसायटी दूध संघाकडून आलेल्या तुपाच्या विक्रीतून २० लाखांवर उलाढाल करील, त्यांचाच जीएसटी क्रमांक घ्यावा. दुधावर तर जीएसटी नाही, त्यामुळे सर्वच दूध सोसायट्यांना जीएसटी क्रमांक देण्याचे परिपत्रक जारी करणे मूळ भोंगळ कारभाराचे लक्षण असल्याची टीका काही दूध उत्पादकांनी केली आहे.

वितरणावरही नाही लक्ष
दूध संघ सध्या जेवढे संकलन करीत आहे, तेवढ्या दुधाची विक्री होत नाही. रोज शिल्लक राहणाऱ्या दुधातून पावडर, लोणी तयार करावे लागते. त्यालाही उठाव नसल्याने दूध पावडर व लोणीची गोदामे भरत आहेत. दूध विक्री वाढविण्यासाठी मार्जीन कमी करण्याची गरज आहे. जसे दूधाचे खरेदी दर कमी केले तसे संघाने त्याचे विक्री दरही कमी करावेत. यामुळे विक्री वाढेल, असेही उत्पादकांचे म्हणणे आहे.

जी सोसायटी किंवा गट हा दूध संघाच्या तुपाची २० लाखांवर विक्री करीत असेल, त्याच सोसायटीचा जीएसटी क्रमांक दूध संघाने घ्यावा. मुळातच दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी नसावा.
- गीता चौधरी, अध्यक्ष, कामधेनू महिला सहकारी दूध सोसायटी, खिरोदा (जि.जळगाव)

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
वर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
भारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...