agriculture news in Marathi, guar at 250 to 450 rupees per ten kg in kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात गवार दहा किलोस २५० ते ४५० रुपये
राजकुमार चौगुले
मंगळवार, 3 एप्रिल 2018

कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, गवारीस समाधानकरक दर मिळाला. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते २२० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. गवारीची दररोज तीस ते चाळीस पोती आवक झाली. गवारीस दहा किलोस २५० ते ४५० रुपये दर होता. 

कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, गवारीस समाधानकरक दर मिळाला. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते २२० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. गवारीची दररोज तीस ते चाळीस पोती आवक झाली. गवारीस दहा किलोस २५० ते ४५० रुपये दर होता. 

गेल्या पंधरवड्यापासून बाजार समितीत दराबाबतचे मंदीचे वातावरण याही सप्ताहात कायमच होते. टोमॅटोची दररोज एक ते दीड हजार कॅरेटची आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस २० ते १०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची आवक नियमित असली, तरी एखाद्या दिवशीच दरात थोडी वाढ होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या पंधरवड्यापासून टोमॅटो, फ्लॉवरला दर नसल्याने शेतकऱ्यांनी हा भाजीपाला अक्षरश: काढून टाकला आहे. यामुळे आवकेतही सातत्य नाही. येत्या महिन्याभरात याचा उलट परिणाम दिसून येणे शक्‍य असल्याचेही बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

कोल्हापूर शहराजवळील गावांतून काकडीची दररोज शंभर ते दीडशे करंड्या आवक झाली. काकडीस दहा किलोस ५० ते २२० रुपये दर होता. फ्लॉवरची साडेतीनशे ते चारशे पोती आवक होती. फ्लॉवरच्या दरात किंचित सुधारणा दिसून आली. फ्लॉवरला दहा किलोस ५० ते २२० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगेची ९० ते १०० पोती आवक होती. शेवगा शेंगेस दहा किलोस १५० ते २०० रुपये दर होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ८०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची अठरा हजार पेंढ्यांची आवक झाली. मेथीच्या आवकेत घट होती. मेथीची दररोज चार ते पाच हजार पेंढ्यांची आवक होती. मेथीस शेकडा ५०० ते १००० रुपये दर होता.

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...