कोल्हापुरात गवार दहा किलोस ३०० ते ४०० रुपये

शेतात पाणी साचून राहिल्याने विशेष करून फळभाज्या काढणी करणे अवघड होत असल्याची माहिती भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.
गवार
गवार

कोल्हापूर : येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. २८) गवारीस दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारीची ३० पोती आवक झाली. गेल्या सप्ताहात सातत्याने होत असलेल्या भाजीपल्याच्या आवकेत घट झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. हिरव्या मिरचीची दररोज २३९ पोती आवक झाली. हिरव्या मिरचीस दहा किलोस १०० ते २३० रुपये दर मिळाला. टोमॅटोची आवक स्थिर होती. टोमॅटोस दहा किलोस ४० ते १६० रुपये दर मिळाला. भेंडीची  १७४ पोती आवक होती. भेंडीस दहा  किलोस १०० ते ३२५ रुपये दर होता. वांग्याची ४५२ पोती आवक होती. वांग्यास दहा किलोस १०० ते ५०० रुपये दर मिळाला. रताळ्याची ४३० पोती आवक झाली. रताळ्यास दहा किलोस ५० ते १२०  रुपये दर मिळाला.  पलेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची १३००० पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ५०० ते २५०० रुपये दर होता. मेथीची १० हजार पेंढ्या आवक होती. मेथीस शेकडा ८०० ते १४०० रुपये दर मिळाला. सीताफळाची दहा ढीग आवक झाली. सीताफळाच्या ५० नगाच्या ढिगास १०० ते ६०० रुपये दर मिळाला.  पावसामुळे भाजीपाला काढणीस अडचण गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने भाजी उत्पादक शेतकऱ्याच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होत आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने विशेष करून फळभाज्या काढणी करणे अवघड होत असल्याची माहिती भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com