सोलापुरात गवार, भेंडीला उठाव; दरही टिकून

भेंडी
भेंडी

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गवार, भेंडीला मागणी वाढली, आवकही चांगली होती,  तरीही त्याचे दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गवारीची रोज ३० क्विंटल, भेंडीची २० क्विंटल आवक होती. ही सर्व आवक स्थानिक भागातून झाली. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना मागणी वाढते आहे. शिवाय आवकेतही सातत्य आहे; पण दर मात्र टिकून आहेत. गवारीला प्रति दहा किलोसाठी २०० ते ३०० रुपये, भेेंडीला १५० ते ३५० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दरही पुन्हा तेजीत राहिले. त्यांची आवक ही तशी जेमतेमच होती. ढोबळी मिरचीला प्रति दहा किलोसाठी १०० ते २३० रुपये आणि हिरव्या मिरचीला १०० ते २५० रुपये इतका दर मिळाला. भाजीपाल्यात मेथी, कोथिंबीर, शेपूची आवकही तुलनेने कमीच आहे. रोज १० हजार पेंढ्यापर्यंत होती. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी २०० ते २५० रुपये, कोथिंबिरीला १०० ते ३०० रुपये आणि शेपूला १०० ते २०० रुपये असा दर मिळाला.  कांद्याच्या दरात मात्र काहीसा चढ-उतार झाला. कांद्याची आवक स्थानिक भागातून सार्वाधिक होती. कांद्याची आवक या सप्ताहात २५० ते ३०० गाड्यांपर्यंत होती. कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते ३५०० व सरासरी २००० रुपये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com