agriculture news in Marathi, guar rates increased in Kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात गवार तेजीत
राजकुमार चौगुले
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात गवारीचे दर तेजीत राहिले. गवारीस दहा किलोस ३५० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारीची आवक घटल्याने दराची तेजी कायम असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

ओल्या मिरचीची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. ओल्या मिरचीस दहा किलोस १५० ते २५० रुपये दर मिळाला. ओल्या मिरचीचे दर गेल्या पंधरा दिवसांपासून स्थिर आहेत. वांग्याची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक होती. वांग्यास दहा किलोस १०० ते २४० रुपये दर मिळाला.

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात गवारीचे दर तेजीत राहिले. गवारीस दहा किलोस ३५० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारीची आवक घटल्याने दराची तेजी कायम असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

ओल्या मिरचीची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. ओल्या मिरचीस दहा किलोस १५० ते २५० रुपये दर मिळाला. ओल्या मिरचीचे दर गेल्या पंधरा दिवसांपासून स्थिर आहेत. वांग्याची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक होती. वांग्यास दहा किलोस १०० ते २४० रुपये दर मिळाला.

महिन्यापूर्वी वांगी व टोमॅटोच्या दरात चांगलीच तेजी होती; परंतु गेल्या महिन्यापासून आवकेत वाढ झाल्याने दराची तेजी कायम राहू शकली नाही. टोमॅटोच्या आवकेत गेल्या पंधरवड्याच्या तुलनेन पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याने टोमॅटोस दहा किलोस ५० ते १२० रुपये दर मिळत आहे. ओल्या वाटाण्याची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक होत आहे. 

ओल्या वाटाण्यास दहा किलोस २०० ते ३५० रुपये दर मिळत आहे. वाटाण्याचा दर स्थिर आहे. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दररोज चौदा हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ४०० रुपये दर होता. कोथिंबिरीच्या दरात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. शेवगा शेंगेच्या आवकेत चांगलीच घट झाली आहे. शेवगा शेंगेस दहा किलोस ५०० ते ७०० रुपये दर मिळाला. 

कांदा पातीला दररोज एक ते दीड हजार रुपये दर मिळाला. मेथीच्या आवकेतही चांगलीच वाढ झाल्याने मेथीचे दरही कमी झाले. मेथीस शेकडा १५० ते २५० रुपये दर मिळाला. पालकला पेंढीस १५० ते  २०० रुपये दर होता. सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची दररोज शंभर बॉक्‍स आवक झाली. द्राक्षास किलोस १५ ते ३० रुपये दर मिळाला. डाळिंबाची दररोज वीस ते पन्नास कॅरेट आवक झाली. डाळिंबास किलोस १० ते ४० रुपये दर होता.

इतर अॅग्रो विशेष
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...
प्रतीक्षा संपली... आजपासून जालन्यात ॲ...जालना : सर्वांना उत्सुकता लागून असेलल्या सकाळ -ॲ...
मोसंबीवर मावा चिकटा वाढलाऔरंगाबाद  : मोसंबीवर मावा व चिकटाचा...
विमा योजनेत हवामान केंद्रांचा घोळजळगाव ः यंदा जाहीर झालेल्या फळ पीक विमा योजनेतही...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल १००० ते ३३००...राज्यातील बाजार समित्यांमध्ये मागील महिनाभरापासून...
मराठवाड्यातील दुष्काळावर ‘इस्राईल’ची...मुंबई ः अपुऱ्या आणि अनियमित पर्जन्यमानामुळे...
अल्पभूधारक दांपत्याची प्रेरणादायी शेतीकोकण म्हटलं की भात, आंबा, काजू, नारळ आदींनी...
कपाशीसाठी नाव कमावलेली अकोटची बाजारपेठअलीकडील काही वर्षांत अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार...
राज्यातील ३४ हजार गावे हागणदारीमुक्तमुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशात...
अडचणीत आठवते शेतीआर्थिक महासत्ता, सर्वसमावेशक विकास अशा गप्पा...
रास्त दर मिळू न देणे हे षड्‌यंत्रच इसेन्शियल कमोडिटी ॲक्‍टचे भाषांतर करताना आवश्‍यक...
सार्वजनिक हेतूसाठी संपादित ग्रामीण...मुंबई : सार्वजनिक हेतूसाठी राज्यात भूसंपादन...
राज्यात कृषी पदवीसाठी ‘सीईटी’लागूपुणे : वैद्यकीय, अभियांत्रिकीप्रमाणेच राज्यातील...
कृषी तंत्रनिकेतनचा नवा अभ्यासक्रम रखडलापुणे : राज्यातील कृषी तंत्रनिकेतनचा नवा...