agriculture news in marathi, Guardian Minister with us not being corrupt: Hasapure | Agrowon

भ्रष्टाचारी नसल्यानेच पालकमंत्री आमच्यासोबत : हसापुरे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

कर्जमाफीवरून शेतकरी राग व्यक्त करतील
गणेश वानकर म्हणाले, "बाजार समितीतील शेतकऱ्यांना एक रुपयांत जेवण दिले जात होते. अनेक शेतकरी याचे लाभार्थी आहे. शेतकऱ्यांनी खाल्लेल्या अन्नाचाही हिशेब आता हे काढायला लागले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या वेळी नोकरदार, सहकारी संस्थेचा पदाधिकारी यांना डावलण्यात आले, त्याचाही राग या निवडणुकीत शेतकरी व्यक्त करतील.''

सोलापूर : लोकमंगल ॲग्रो, बेकायदेशीर बंगला यासह अनेक प्रकरणे ताजी असताना दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे चुकीचे आहे. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना अडकविण्याचा डाव सहकारमंत्री सुभाष देशमुख करत आहेत. आम्ही जर भ्रष्टाचारी असतो तर स्वच्छ प्रतिमेचे आणि कोणत्याही वादात नसलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख आमच्यासोबत आले असते का? असा सवाल जिल्हा बॅंक संचालक सुरेश हसापुरे व नगरसेवक गणेश वानकर यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

हत्तूर येथील प्रचार सभेत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह अन्य वक्‍त्यांनी केलेल्या आरोपांचा समाचार हसापुरे व वानकर यांनी घेतला.

हसापुरे म्हणाले, की बाजार समितीच्या कारभाराची चौकशी व्हावी, अशा मागणीचे पत्र मी व शिवदारे यांनी तत्कालीन पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिले होते. त्यांनी या पत्रानुसार चौकशी केली. या तक्रारीत तथ्य नसल्याचे पत्र तत्कालीन लेखापरीक्षकांनी दिले आहे. सहकार व पणन खाते देशमुख यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी फेरचौकशी केली. सत्तेचा वापर करून फेर चौकशी करून निवडणुकीच्या तोंडावर हे षडयंत्र आखले आहे.  

 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...