जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा रद्द

पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा रद्द
पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा रद्द

जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोमवारचा (ता. १८) नियोजित जिल्हा दौरा पुन्हा एकदा रद्द झाला. हा दौरा रद्द झाल्याची माहिती ऐनवेळी त्यांच्या सहायकांकडून प्रशासनाला देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील विरोधकांसह शेतकरी, ग्रामस्थांचे प्रश्‍न रखडलेलेच राहतील. जिल्ह्यातील कळीच्या मुद्द्यांवर पालकमंत्री ठोस निर्णय केव्हा घेतील, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. 

पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी जिल्हा नियोजन भवनात नियोजन समितीची बैठक आयोजिण्यात आली होती. त्यांच्या हस्ते शिवाजीनगर (जळगाव) येथील उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजनही ठरले होते. पुढे कर्जवितरण व पीक कर्जासंबंधीचे मुद्दे येतील.

सध्या राष्ट्रीयीकृत बॅंका कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज नाकारत आहेत. जिल्हा स्ततावरील शाखेत जा, असे सांगत आहेत. कर्ज वितरणासंबंधी डिक्‍लेरेशनची प्रक्रिया बंद करून थेट रजिस्टर मॉर्गेजची अट टाकत आहेत. रब्बीमध्ये फक्त ३६ टक्के पीक कर्जवितरण झाले. पुढे खरिपातही बॅंका अडवणूक करतील. याबाबत काही शेतकरी पाटील यांची भेट घेण्याच्या तयारीत होते. परंतु त्यांचा दौरा रद्द झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

 गिरणा, पांझरा, वाघूरनदीकाठी पाणीटंचाई आहे. प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे. परंतु तापीमधून किमान एक आवर्तनाची मागणी यावल, चोपडामधील शेतकरी करीत आहेत. धानोरा, अडावद, पंचकसारख्या भागाला या आवर्तनाचा लाभ होईल. यावलमधील चिखली, पाडळसे, बामणोद, म्हैसवाडी आदी गावांनाही लाभ मिळू शकतो. परंतु आवर्तन  जिल्हा प्रशासनाने नाकारले आहे.

 गिरणा नदीत मध्यंतरी आवर्तन सुटले असताना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नदीवर ठेवलेले कृषिपंप उचलून  नेले. तसेच वीजही बंद केली. पाणी असून,   त्याचा उपयोग शेतकरी करू शकले नाहीत. या संदर्भातही शेतकरी पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडणार होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com