agriculture news in marathi, Guidance on expertise of grape growers | Agrowon

द्राक्ष उत्पादकांना तज्ज्ञांचे बांधावर मार्गदर्शन
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

नाशिक : द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे थेट द्राक्ष उत्पादकांच्या प्लॉटवर चर्चा, मार्गदर्शनपर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.  

द्राक्ष विज्ञान मंडळाच्या द्राक्ष विज्ञान अभियानाअंतर्गत अभ्यास दौऱ्याचा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील मामा जम्बो व सुधाकर या द्राक्ष वाणांची झालेली लागवड व त्यासाठी आवश्यक असलेले नियोजन या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मामा जम्बो वाणाचे जनक दीपक वायकर, सुधाकर द्राक्ष वाणाचे जनक सुधाकर क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. 

नाशिक : द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे थेट द्राक्ष उत्पादकांच्या प्लॉटवर चर्चा, मार्गदर्शनपर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.  

द्राक्ष विज्ञान मंडळाच्या द्राक्ष विज्ञान अभियानाअंतर्गत अभ्यास दौऱ्याचा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील मामा जम्बो व सुधाकर या द्राक्ष वाणांची झालेली लागवड व त्यासाठी आवश्यक असलेले नियोजन या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मामा जम्बो वाणाचे जनक दीपक वायकर, सुधाकर द्राक्ष वाणाचे जनक सुधाकर क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. 

या अभ्यास दौऱ्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी थेट प्लॉटवर भेटी देण्यात आल्या. माडसांगवी येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप पेखळे यांच्या प्लॉटला भेट देऊन सरपंच मीराबाई पेखळे यांच्या हस्ते दौऱ्याचा प्रारंभ करण्यात आला. यानंतर ओझर येथील द्राक्ष बागायतदार निंबाळकर, शिरसगाव येथील तुषार मोरे, तळेगाव येथील अशोक पाटील यांच्या प्लॉटला भेटी दिल्या. या दोन्ही द्राक्ष वाणांसंदर्भातील अडचणी जाणून घेऊन तज्ज्ञ मार्गदर्शकांनी बागेसंदर्भातील व्यवस्थापन, उत्पादन याबाबत मार्गदर्शन केले. 

राहुल जाधव, विशाल मिरजे यांनी द्राक्ष उत्पादकांना खत, पाणी व्यवस्थापनाबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले. राहाता, संगमनेर, नारायणगाव या ठिकाणांहून अनेक द्राक्ष उत्पादक सहभागी झाले. मंडळाचे संचालक विजय पिंगळे, रामदास मोरे, शांताराम कमानकर, वसंत शेजवळ, रवी थेटे यांनी परिश्रम घेतले. अभियानाचे समन्वयक म्हणून मंडळाचे अध्यक्ष वसंत ढिकले यांनी काम पाहिले.

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...