agriculture news in marathi, Gujarat declares 500 rupees bonus for cotton growers in state | Agrowon

गुजरातमध्ये कापसाला ५०० रुपये बोनस
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई : हंगामात बंपर उत्पादनाचा अंदाज असल्याने बाजारात कापसाचे दर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कापसाला किमान आधारभूत किमतीच्या वर प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे, अशी माहिती गुजरात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  

‘‘राज्यातील कापूस उत्पादकांकडून खरेदी केलेल्या कापसाला किमान आधारभूत किमतीवर २० किलोसाठी १०० रुपये बोनस देण्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी (ता. २२) घेतला,’’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  

मुंबई : हंगामात बंपर उत्पादनाचा अंदाज असल्याने बाजारात कापसाचे दर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कापसाला किमान आधारभूत किमतीच्या वर प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे, अशी माहिती गुजरात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  

‘‘राज्यातील कापूस उत्पादकांकडून खरेदी केलेल्या कापसाला किमान आधारभूत किमतीवर २० किलोसाठी १०० रुपये बोनस देण्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी (ता. २२) घेतला,’’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  

गुजरातमध्ये सर्वाधिक उत्पादित होणाऱ्या मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसासाठी यंदा केंद्राने प्रतिक्विंटल ४२७० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना आता बोनससह ४७७० रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार आहे. राज्यातील हजर कापूस बाजार दिवाळीत बंद झाला. बाजार बंद झाला त्या वेळी कमी प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल ४७५० ते ५००० रुपयांंपर्यंत दर मिळाला. हा दर हमीभावापेक्षा अधिक आहे.  

राज्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राबरोबर राज्यभरात जवळपास ५६ खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. यातील ४० खरेदी केंद्रे १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. गुजरात हे महाराष्ट्र आणि तेलंगणानंतर तिसरे महत्त्वाचे कापूस उत्पादक राज्य आहे. गुजरात सरकराने २०१७-१८ च्या हंगामात ७.३६ दशलक्ष गाठी कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

जास्त उत्पादनामुळे आतापर्यंत तरी कापसाच्या दरात जास्त चढ-उतार पाहायला मिळाला नाही. एकदा बाजारात कापसाची आवक वाढली, की दर हमीभावापर्यंत खाली येतील अशी आम्हाला आशा आहे.
-  एन. एम. शर्मा, 

कार्यकारी संचालक, गुजरात राज्य सहकारी कापूस महासंघ

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...