agriculture news in marathi, Gujarat Pattern for bollworm control | Agrowon

बोंड अळी नियंत्रणासाठी `गुजरात पॅटर्न` उपयुक्त
डॉ. विजय वाघमारे
बुधवार, 20 जून 2018

बोंडअळी निर्मूलनासाठी गुजरात राज्यात कापूस उत्पादक शेतकरी, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, बियाणे कंपन्या, कीडनाशक कंपन्या, जिनिंग प्रेसिंग व्यवसायिक यांनी सामूहिक प्रयत्न केले. कापूस उत्पादन होते त्या ठिकाणी कामगंध सापळे (फेरोमॅन ट्रॅप) लावले गेले. रिफ्युजी बियाणे लावण्याची गरज का आहे, याविषयी शेतकऱ्यांमध्ये व्यापक जागृती करण्यात आली.

बोंडअळी निर्मूलनासाठी गुजरात राज्यात कापूस उत्पादक शेतकरी, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, बियाणे कंपन्या, कीडनाशक कंपन्या, जिनिंग प्रेसिंग व्यवसायिक यांनी सामूहिक प्रयत्न केले. कापूस उत्पादन होते त्या ठिकाणी कामगंध सापळे (फेरोमॅन ट्रॅप) लावले गेले. रिफ्युजी बियाणे लावण्याची गरज का आहे, याविषयी शेतकऱ्यांमध्ये व्यापक जागृती करण्यात आली.

जिनिंगच्या ठिकाणी कापसाची साठवणूक आणि प्रक्रिया होते. या ठिकाणीदेखील फेरोमॅन ट्रॅपचा वापर केला गेला. त्यातून बोंड अळीचा प्रादुर्भाव टप्प्याटप्प्याने कमी करण्यात गुजरातमध्ये यश आले. या साऱ्या शिफारसी २०१४-१५ मध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने गुजरातसाठी केल्या होत्या. हाच पॅटर्न आता गुजरात पॅटर्न म्हणून ओळखला जात आहे. यापूर्वी पंजाब, हरियानामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला होता. त्या वेळी पंजाब कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने सार्वत्रिक प्रयत्न करून त्यावर नियंत्रण मिळविले. 

महाराष्ट्रातदेखील बोंड अळी निर्मूलनासाठी जागृती करण्याकरिता कृषी विभाग प्रयत्नरत आहे. कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार त्यासाठी आग्रही आहेत. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनेदेखील बोंड अळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या अकोला, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत मेळाव्यांचे आयोजन करून शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक माहिती पोचविली. त्याचा परिणाम म्हणून अनेक शेतकऱ्यांनी फरदड (खोडवा) न घेता कपाशीची झाडे काढून शेत स्वच्छ केले. या वर्षीच्या खरीप हंगामात पूर्वहंगामी कापूस लागवडीवर नियंत्रण मिळविता यावे, याकरिता कृषी विभागाने बाजारात बियाणे उशिरा आणण्याचा निर्णय घेतला. हे सारे प्रयत्न बोंड अळीच्या नियंत्रणासाठी पूरक ठरतील. गेल्या हंगामात अनधिकृतरीत्या एचटी बियाणे लागवड काही भागात झाली. एचटीबीटी बियाणे नुकसानकारक असून, त्याचा अनधिकृत साठा व लागवड गुन्हाच आहे.

संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर)

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...