agriculture news in marathi, Gujarat summer crop acreage falls as supply from Narmada dam dries up | Agrowon

गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात घट
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी पाणीसाठ्यामुळे गुजरात राज्यात उन्हाळी पिकांच्या लागवड क्षेत्र घट झाली आहे. भुईमूग, तीळ, बाजरी, मूग अाणि उडीद या पिकांचे लागवड क्षेत्र कमी झाले आहे. 

मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी पाणीसाठ्यामुळे गुजरात राज्यात उन्हाळी पिकांच्या लागवड क्षेत्र घट झाली आहे. भुईमूग, तीळ, बाजरी, मूग अाणि उडीद या पिकांचे लागवड क्षेत्र कमी झाले आहे. 

गुजरात राज्यात उन्हाळी भुईमूग लागवड क्षेत्रात २५ टक्के घट होऊन यंदा ४६ हजार १०० हेक्टरपर्यंत पोचले आहे. तीळात यापेक्षाही अधिक ३१ टक्के घट होऊन १४ हजार ३०० हेक्टरवर लागवड झाली आहे. मूग लागवड ५ टक्के घटून २६ हजार २०० हेक्टर, उडदात १९ टक्के घट होऊन ६ हजार ८०० हेक्टर; तर बाजरीत ०.३ टक्के घट होऊन २ लाख १४ हजार १०० हेक्टरवर यंदा लागवड झाली आहे. सरदार सरोवर नर्मदा निगम लि., या सरकारी कंपनीने जानेवारी महिन्यातच १५ मार्चनंतर लाभ क्षेत्रात सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. २०१७ मध्ये कमी मॉन्सूनमुळे प्रकल्पातही कमी पाणीसाठा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. नर्मदा प्रकल्पातून उन्हाळी पिकांना सिंचनाकरिता पाणी देण्यासंदर्भात कोणतेही धोरण नाही. मात्र अतिरिक्त पाणी असल्याने यापूर्वी ते दिले गेले, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

या निर्णयामुळे तीळ, भुईमूग, बाजरी आणि कडधान्य लागवडीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. नर्मदा प्रकल्पात सर्वच शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध नाही. केवळ पिण्याच्या पाण्याकरिताच साठा उपलब्ध असल्याने सिंचनाकरिता पाणी दिले जाणार नसल्याचे कृषी अधिकारी धिरेन छावडा यांनी सांगितले. 

सामान्यत: संपूर्ण खोऱ्यात २८ दशलक्ष फूट पाणी पुरविले जाते. एक एकर फूट पाणी म्हणजे, एक एकर क्षेत्रात एक फूट पाणी. कमी मॉन्सूनमुळे यंदा केवळ १४.८ दशलक्ष एकर फूट पाणी उपलब्ध आहे. यात गुजरातचा वाटा ९ दशलक्ष एकर फूट असला, तरी सध्या ते उपलब्ध नाही. केवळ ४.८ दशलक्ष एकर फूट पाणी फेब्रुवारीत देण्यात आल्यासे कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...