"विकासा'ची साथ अन्‌ फटकाही...

"विकासा'ची साथ अन्‌ फटकाही...
"विकासा'ची साथ अन्‌ फटकाही...

अहमदाबाद, गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या गृहराज्यात पुन्हा एकदा भाजपने सत्ता राखली आहे. गेली 22 वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपची या वेळी मात्र विजयासाठी अक्षरशः दमछाक झाली. निवडणुकीआधीच सुरू झालेल्या "विकासा'च्या मुद्द्याने भाजपला साथ दिली आणि बराच मोठा फटकाही दिला. दुसरीकडे, कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्यादृष्टीने पक्षाने मारलेली मुसंडी समाधानकारक म्हणावी लागेल.

"जीएसटी' आणि नोटाबंदीबरोबरच पाटीदार समाज, ओबीसी आणि दलित नेत्यांचे आव्हान भाजपपुढे यंदा होते. तरीही मोदी यांचा विकासाचा कार्यक्रम बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसते; पण त्याचवेळी भाजपला सौराष्ट्रात पाटीदार आंदोलनाची झळ बसली. येथील 54 जागांपैकी कॉंग्रेसला 30 आणि भाजपला 23 जागा मिळाल्या. एक जागा अपक्षाने जिंकली. मात्र, उत्तर, दक्षिण आणि मध्य गुजरातेत ते जमले नाही. या तीनही भागांत; अगदी पाटीदारबहुल मतदारसंघांतही भाजपने विजय मिळवला.

सौराष्ट्र आणि कच्छसह अन्यत्र कॉंग्रेसने दिलेली कडवी लढत हे यंदाच्या निवडणुकीेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. राहुल गांधी यांचे दौरे त्यासाठी उपयोगी ठरले. त्याचवेळी नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती प्रचारामुळे भाजपला विजय मिळाला. काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या पराभवामुळे उत्तर गुजरातमधील बनासकांठाचे निकाल भाजपला दुःखदायक आहेत. अमरेली आणि गीर-सोमनाथ या जिल्ह्यांत पाचपैकी चार जागा जिंकत कॉंग्रेसने भाजपला धक्का दिला. माजी कृषिमंत्री दिलीप संघानी यांना पराभवाचा झटका बसला. तथापि, भाजप नेते मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनी गड राखले.

१५० जागांचे स्वप्न भंगले कॉंग्रेसच्या ज्येष्ठांनाही पराभवाचा फटका बसला. सिद्धार्थ पटेल आणि अर्जुन मोधवाडिया या कॉंग्रेसच्या दोन माजी प्रदेशाध्यक्षांना अनुक्रमे डभोई आणि पोरबंदरमध्ये पराभव पत्करावा लागला. घियासुद्दीन शेख (दर्यापूर) आणि इम्रान खेडावाला (जमालपूर-खाडिया) या दोन कॉंग्रेस उमेदवारांना मात्र विजय मिळाला. हे दोन्ही मतदारसंघ अहमदाबाद शहरात येतात. अपक्ष उमेदवार व दलित नेते जिग्नेश मेवानी आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर अनुक्रमे वडगाम आणि राधनपूर मतदारसंघांतून जिंकले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत बक्षी यांचा खेडा जिल्ह्यातील उमरेठमध्ये पराभव झाला. पाटीदार अमानत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल याच्या कथित अश्‍लील सीडींचे प्रकरण, पाटीदारांना आरक्षण मिळण्याबाबतची अनिश्‍चितता यांचाही निवडणुकीवर परिणाम झाला. भाजपचे "150 आणि अधिक' जागांचे स्वप्नही भंगले. भाजपने कसाबसा गड राखला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com