गुजरातमध्ये भाजपच येणार; राहुल गांधींचा प्रभाव नाही; मोदी लाट कायम राहणार!

गुजरातमध्ये भाजपच येणार; राहुल गांधींचा प्रभाव नाही; मोदी लाट कायम राहणार!
गुजरातमध्ये भाजपच येणार; राहुल गांधींचा प्रभाव नाही; मोदी लाट कायम राहणार!

अधिकृतरित्या राहुल गांधी अध्यक्ष झाल्यामुळे उत्साहात असलेली गुजरात कॉंग्रेस, पाटीदार आरक्षणाच्या आंदोलनामुळे एकदम प्रकाशझोतात आलेले हार्दिक पटेल यांचे नेतृत्त्व आणि प्रसिद्धी माध्यमांमधून दिसणाऱ्या चित्रांतून तयार झालेल्या भाजपविरोधी भावनेवर पुन्हा 'नरेंद्र मोदी' या नावाने मात केल्याचे सर्वच 'एक्‍झिट पोल'मधून दिसून येत आहे. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर सर्वच वृत्तवाहिन्यांवर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचे 'एक्‍झिट पोल' प्रसिद्ध होण्यास सुरवात झाली. या सर्वच चाचण्यांमधून 'गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येणार' असा निष्कर्ष समोर येत आहे.  अर्थात, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दावा केल्याप्रमाणे गुजरातमध्ये 150 जागा जिंकणे अशक्‍य आहे, असेही या सर्वेक्षणांतून दिसून येत आहे. तरीही, गुजरातमधील भाजपची 22 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात कॉंग्रेसला यंदा यश येणार नाही, असेच चित्र आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे सत्तेत पुनरागमन होणार, असेही निष्कर्ष या 'एक्‍झिट पोल'मधून समोर आले आहेत. 

गेले दोन महिने सुरू असलेल्या या रणधुमाळीचा निकाल येत्या सोमवारी (18 डिसेंबर) लागणार आहे. निकालाचे एक्झिट पोल घेतलेल्याविविध सर्वेक्षण संस्थांकडून गुजरातमध्ये भाजपचाच विजय होईल, असे संकेत देण्यात आले आहेत. गुजरात विधानसभेच्या 182 जागांपैकी भाजप 92 हा 'मॅजिक फिगर'चा आकडा नक्कीच पार करेल आणि काँग्रेसचा पराभव होईल, असे या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.  

गुजरात भाजप काँग्रेस इतर
इंडिया टुडे-अॅक्सिस 99 ते 113 68 ते 84 1 ते 4
रिपब्लिक 108 74 N/A
सहारा समय-सीएनएक्स 110 ते 120 65 ते 75 N/A
टाईम्स नाऊ व्हीएमआर 115 65 2
सी-व्होटर 108 74 N/A
एबीपी लाईव्ह 93 48 1
टाईम्स नाऊ 109 70 3
हिमाचल प्रदेश भाजप काँग्रेस इतर
टुडेज चाणक्य 55 13 0
इंडिया टुडे-अॅक्सिस 47 ते 55 13 ते 20 0 ते 2
सी-व्होटर 41 25 2

मागील 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 115 जागा जिंकत बहुमताचा आकडा सहज पार केला होता. मात्र, त्यावेळी काँग्रेसला अवघ्या 61 जागांवर समाधान मानावे लागले. तसेच गुजरात परिवर्तन पक्षाला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 2, संयुक्त जनता दल आणि इतर प्रत्येकी 1 जागा मिळाली होती. त्यानंतर आज शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल जारी झाले आहेत. यामध्येही भाजपचे 'कमळ'च विजयी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com