agriculture news in marathi, Gujrat government to convert seawater for domestic purpose | Agrowon

गुजरात करणार समुद्राचे पाणी गोड
महेश शहा : सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 14 मे 2018

अहमदाबाद : गुजरातमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळेच या समस्येवर मात करण्यासाठी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड पाण्यात रूपांतर करणाचे प्रकल्प उभे करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. यासाठी अंदाजे आठशे कोटी रुपये खर्च येणार आहे.

अहमदाबाद : गुजरातमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळेच या समस्येवर मात करण्यासाठी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड पाण्यात रूपांतर करणाचे प्रकल्प उभे करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. यासाठी अंदाजे आठशे कोटी रुपये खर्च येणार आहे.

गुजरातला सोळाशे किलोमीटरचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. या नव्या प्रकल्पासाठी या किनारपट्टीचा पुरेपूर फायदा घेण्याची राज्य सरकारची इच्छा आहे. या योजनेतील पहिला प्रकल्प जामनगर येथे उभारला जाणार असून, त्यासाठी इस्राईलच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर राज्य सरकार इतर किनारपट्टींवर आणखी दहा प्रकल्प उभारेल, असे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सांगितले आहे. या प्रकल्पांमुळे कच्छ आणि सौराष्ट्रातील सुमारे दहा लाख जनतेला रोज गोडे पाणी मिळणार असल्याने त्यांच्यासाठी हे वरदान ठरेल, असा दावाही रूपानी यांनी केला आहे.

समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करून समस्येवर मात करण्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणारे गुजरात हे दुसरे राज्य ठरणार आहे. तमिळनाडूनेही हा प्रकल्प राबविला आहे. हे प्रकल्प खासगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारले जाणार आहेत. पाणी गोडे केल्यानंतर ते राजकोट, जामनगर, मोर्बी, द्वारका, पोरबंदर, सुरेंद्रनगर आणि कच्छमधील गावांना पुरविले जाणार आहे. या प्रकल्प उभारणीचे कंत्राट एस्सेल इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स या कंपनीला देण्यात आले आहे. प्रकल्प उभारणीसाठी येणारा सर्व आठशे कोटी रुपयांचा खर्च कंपनीच पेलणार असून, सरकार त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर २५ वर्षांचा पाणीखरेदीचा करार करणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...