agriculture news in marathi, Gujrat government not Interested to have plastic Ban | Agrowon

प्लॅस्टिकबंदी करण्यावर गुजरात सरकार उदासीन
महेश शहा ः सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 जून 2018

अहमदाबादः केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जागतिक पर्यावरण दिन प्लॅस्टिक प्रदूषणविरोधी दिन म्हणून पाळावयाचा निर्णय केला असला, तरी त्यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातेत मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. किंबहुना, प्लॅस्टिकबंदीबाबत राज्य सरकार अनुत्सुक असल्याचे चित्र आहे.

अहमदाबादः केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जागतिक पर्यावरण दिन प्लॅस्टिक प्रदूषणविरोधी दिन म्हणून पाळावयाचा निर्णय केला असला, तरी त्यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातेत मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. किंबहुना, प्लॅस्टिकबंदीबाबत राज्य सरकार अनुत्सुक असल्याचे चित्र आहे.

गुजरातचा शेजारी असलेल्या महाराष्ट्राने प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे, पण रोजगार जाण्याचे कारण देत गुजरातेत मात्र त्यासंदर्भात चालढकल सुरू आहे. उच्च न्यायालयाने ताशेरे ओढूनही गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अद्याप प्लॅस्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी यंत्रणा नाही. राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री जयद्रथसिंह परमार यांचाच प्लॅस्टिकबंदीला विरोध आहे. त्यांच्या हलोल मतदारसंघात प्लॅस्टिक पिशव्यांचे सुमारे १५० कारखाने असण्याचे कारण त्यामागे आहे. थातूरमातूर प्रसिद्धीपेक्षा महाराष्ट्र आणि सिक्कीमच्या धर्तीवर गुजरातनेही प्लॅस्टिकवर बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ते महेश पंड्या यांनी केली आहे. बंदी असलेल्या प्लॅस्टिकची निर्मिती करणाऱ्या कारखानदारांच्या पाठीशी पर्यावरणमंत्रीच असणे, दुर्दैवाचे आहे. गुजरात मॉडेल राज्य असताना प्लॅस्टिबंदी का होत नाही, असा प्रश्‍न त्यांनी केला. 

   दरम्यान, महाराष्ट्राकडून प्रेरणा घेत गुजरातेतील अहमदाबाद आणि राजकोट महानगरपालिकांनी मंगळवार (ता.५)पासून प्लॅस्टिकबंदी जाहीर केली. जागतिक पर्यावरणदिनानिमित्त हा निर्णय करण्यात आला
 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...