मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी ३० हजार रुपयांची मदत

शिवराजसिंह चौहान
शिवराजसिंह चौहान

नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीत पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिहेक्टर ३० हजार रुपये मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.  मुख्यमंत्री चौहान म्हणाले, की राज्यातील काही भागांत नुकतेच गारपीट व वादळी वारा आणि पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार विमा योजनेतून प्रतिहेक्टर ३० हजार रुपये अनुदान देणार आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्जवसुली पुढे ढकलण्यात येणार आहे.

मध्य प्रदेश हे चना उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे तर गहू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतेच राज्यातील काही भागांत गारपीट झाली होती. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने स्थानिक प्रशासनाला दिले होते. या भागातील गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे आणि नुकसानीची आकडेवारी कळण्यासाठी आणखी वेळ लागेल, असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. त्यातच यंदा मागील वर्षीच्या तुलनेत गहू पेरणीत १७.२ टक्के घट होऊन केवळ ५.३ दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com