agriculture news in Marathi, Hailstorm possibilities in central Maharashtra, Marathwada and vidhrbha, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारपिटीचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

पुणे ः कोकणात समुद्रसपाटीपासून साधारणपणे नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामानाची स्थिती तयार झाली असून, उन्हाचा चटका वाढला आहे. उद्या (ता. २३) मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात, तर शनिवारी (ता. २४) आणि रविवारी (ता. २५) उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

पुणे ः कोकणात समुद्रसपाटीपासून साधारणपणे नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामानाची स्थिती तयार झाली असून, उन्हाचा चटका वाढला आहे. उद्या (ता. २३) मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात, तर शनिवारी (ता. २४) आणि रविवारी (ता. २५) उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

बांगलादेशच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच लक्षद्वीप ते अरबी समुद्र, कर्नाटकाच्या भागातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र मध्य महाराष्ट्र ते अरबी समुद्र व दक्षिण महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. अरबी समुद्राचा परिसर, गोवा व उत्तर मध्य महाराष्ट्र या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

त्यामुळे राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाची स्थिती तयार झाली होती. परिणामी उन्हाचा चांगलाच उकाडा वाढला होता. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. आज (गुरुवारी) गोव्यासह राज्याच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहील. पुणे परिसरातही शनिवारी व रविवारी हवामान अंशतः ढगाळ राहील. बुधवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ११.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली.  

बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)  : मुंबई (सांताक्रूझ) १९.२ (१), अलिबाग १९.८ (१), रत्नागिरी १९.८, भिरा १६.५, डहाणू १९.८ (१), पुणे १३.३ (१), नगर १३.६ (-१), जळगाव १४.२ (-१), कोल्हापूर २०.७ (४), महाबळेश्वर १६.२ (२), मालेगाव १४.६ (२), नाशिक १३.४ (१), निफाड ११.६, सांगली १८.७ (३), सातारा १६.० (१), सोलापूर २१.० (३), औरंगाबाद १७.० (३), बीड १६.४ (१), उस्मानाबाद १५.७, परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १३.६, परभणी शहर १६.९, नांदेड २०.० (४), अकोला २०.५ (४), अमरावती २०.२ (२), बुलढाणा १९.३ (२), चंद्रपूर २१.८ (४), गोंदिया १४.६ (-२), नागपूर १५.६, वर्धा १८.५ (२), यवतमाळ २१.० (३).

इतर अॅग्रो विशेष
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...