agriculture news in Marathi, hailstorm possibility in central Maharashtra by Friday, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018


अरबी समुद्र व मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी व शनिवारी पुन्हा मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
- ए. के. श्रीवास्तव, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे

पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा ते मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. येत्या शुक्रवारी (ता. २३) मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार तर शनिवारी (ता. २४) औरंगाबाद, जालना, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती भागांंत मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी विर्तविली. 

लक्षद्वीप परिसर ते अरबी समुद्र, कर्नाटक व महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र लक्षद्वीपकडून अरबी समुद्र, गोवा, कर्नाटकच्या दिशेने सरकत आहे. तसेच बांग्लादेशच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २२) हिमालयाच्या काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. शुक्रवारी (ता. २३) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील. शनिवारी (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात गारपीटीची शक्यता आहे. उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील.

मंगळवारी (ता.२०) गोव्यासह, संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागांत, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १०.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. 
 

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...