agriculture news in Marathi, Hailstorm in several places in Rajasthan, Maharashtra | Agrowon

राजस्थानमध्ये अनेक भागांत गारपीट
वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

जयपूर, राजस्थान ः राज्यात रविवारी (ता.४) सीकर, जयपूर, बिकानेर, अलवर जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत जोरदार गारपीट झाली; तर झुंझूनू आणि चुरू आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गारपीट आणि पावसाने शेतातील मोहरी, गहू आणि जवस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जयपूर, राजस्थान ः राज्यात रविवारी (ता.४) सीकर, जयपूर, बिकानेर, अलवर जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत जोरदार गारपीट झाली; तर झुंझूनू आणि चुरू आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गारपीट आणि पावसाने शेतातील मोहरी, गहू आणि जवस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

रविवारी राजस्थानमधील सिकर, बिकानेर आणि अलवर जिल्ह्यांमध्ये जवळपास १५ मिनिटे गारपीट झाली. भारतीय हवामान विभागाने ईशान्य राजस्थानमध्ये गारपिटीचा इशारा दिला आहे. अलवर, भरतपूर, ढोलपूर आणि झुंझूनू जिल्ह्यांमध्ये पुन्हा गारपिटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जयपूर भागात गारपीट आणि पावसामुळे किमान तापमान १६ अंशसेल्सिअसपर्यंत कमी झाले होते. अचानक आलेल्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या आणि काढणीला आलेल्या मोहरी, गहू आणि जवस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.   

दरम्यान, मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी स्थानिक प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार गारपिटीने या भागातील पिकांचे २० ते ५० टक्के नुकसान झाले आहे. 

वीज पडून चार जखमी
शाहपुरा भागातही जोरदार गारपीट आणि पाऊस झाला. या वेळी विजांसह साेसाट्याचा वाराही होता. रविवारी सकाळी निरभ्र आकाश असल्याने शेतकरी व कामगार आपआपल्या कामात व्यग्र होते. मात्र, अचानक वातावरणात बदल होऊन गारपीट आणि पावसाला सुरवात झाली. येथे चार कामगार भिंतीचे बांधकाम करत होते. या वेळी त्यांच्यावर वीज कोसळली आणि ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उत्तर प्रदेशातही गारपिटीचा झटका
मथुरा जिल्ह्यात रविवारी (ता.८) अनेक भागांत जोरदार गारपीट झाली. या गारपिटीने जिल्ह्यातील जवळपास १२ पेक्षा जास्त गावांतील १०० एकरावर पिकांचे नुकसान झाले आहे. गारपीट झाली असली तरी जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

मथुरा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र कुमार म्हणाले, की जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी गारपीट झाली आहे. गारपीट आणि नुकसानीची माहिती घेण्यासाठी स्थानिक तहसीलच्या अधिकाऱ्यांचे पथक रवाना झाले आहे. पथकाने पाहणी केल्यानंतरच किती नुकसान झाले, याची माहिती मिळेल. जिल्ह्यातील जवळपास १०० एकरांवरील पिकांना गारपिटीने फटका बसला आहे. मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 

‘‘मथुरा जिल्ह्यातील रायपूर, मानकपूर, मुसुमना, खुस्लागडी, तिलकगडी, खानपूर, मानगडी, भगवानगढी आणि शेजारच्या गावांमध्ये गहू आणि मसूर या पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतातील वस्तूंचे नुकसान झाले आहे’’, असे बहुजन समाज पार्टीचे आमदार शाम सुंदर शर्मा यांनी सांगितले. 

उपविभागीय अधीकारी चट्टा राजेंद्र पेनसिया म्हणाले, की जिल्ह्यातील जवळपास १५ गावांतील पिकांचे नुकासान झाल्याचे वृत्त आहे. गारपीटग्रस्त गावांमध्ये पथक पाठविले असून तेथील नुकसानीची माहिती घेणे व स्थानिकांना अडचणीच्या काळात मदत करणे आदी कामे ही पथके करणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...