agriculture news in Marathi, hailstorm in west Vidarbha, Maharashtra | Agrowon

पूर्व विदर्भात गारपीट
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मार्च 2019

पुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार झालेल्या वाऱ्याच्या संगमामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी बुधवारी (ता. २०) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीने चांगलाच तडाखा दिला असून वर्धा जिल्ह्यात वीज कोसळ्याने दोघांचा मृत्यू झाला. अवेळी झालेल्या जोराच्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडत गहू, हरभरा, वाटाणा, लाखोळी, आंब्याच्या कैऱ्या, संत्रा या पिकांचे मोठे नुकसान झाले.  

पुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार झालेल्या वाऱ्याच्या संगमामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी बुधवारी (ता. २०) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीने चांगलाच तडाखा दिला असून वर्धा जिल्ह्यात वीज कोसळ्याने दोघांचा मृत्यू झाला. अवेळी झालेल्या जोराच्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडत गहू, हरभरा, वाटाणा, लाखोळी, आंब्याच्या कैऱ्या, संत्रा या पिकांचे मोठे नुकसान झाले.  

पूर्व विदर्भात दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन काही अंशी ढगाळ हवामान झाले. यामुळे अनेक ठिकाणी विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरील लावली. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात धपकी शिवारात गावातील देंवेद्र कवडू सहारे व सत्तार शेख हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. पावसापासून संरक्षण होण्यासाठी झाडाखाली उभे असताना त्याच्यावर वीज कोसळून मृत्यू झाला. तर गिरड परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू पिकांचे मोठे नुकसान झाले.

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, मोहगाव, वरठी, लाखनी तसेच जवाहरनगर, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा, गोंदिया शहर, नागपूर जिल्ह्यामधील सावनेर तालुक्यातील केळवद परिसर, रामटेक, मौदा, पारशिवनी, काटोल तालुक्यांतील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला गहू, हरभरा पिकांसह संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तसेच विविध तालुक्यांत अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळे आले होते.

काटोल तालुक्यातील संत्रा रोपवाटिकानाही गारपिटीचा मोठा फटका बसला. तर आजनगाव येथे निळकंठ कुकडे यांचे घर वादळी पावसामुळे व गारपिटीने कोसळले. मौदा तालुक्यातील मिरची उत्पादकांनाही गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. होळीच्या दिवशी पाऊस झाल्याने कापणीवर आलेला गहू वादळी पावसाने जमीनदोस्त झाला. त्यामुळे होळी सणावर विरजण पडल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. 

पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. गुरुवारी (ता. २१) दिवसभर या भागात काही अंशी ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणात उकाडा तयार होऊन कमाल तापमानात वाढ झाली होती. गुरुवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील अकोला येथे ४०.० अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती. तर अमरावती, बुलढाणा, वाशीम, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागांतील कमाल तापमान ३४ ते ३९ अंश सेल्‍सिअसच्या दरमान होते. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण या भागांतही वाढलेल्या तापमानामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच तीव्र झाल्या होत्या.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता
कर्नाटकाचा उत्तर भाग ते मध्य महाराष्ट्राचा परिसर ते तेलंगण या दरम्यान समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच विदर्भातही कमी दाबाचे क्षेत्र असून त्याची चक्राकार वाऱ्यामध्ये रूपातर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार होऊन मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
       
गुरुवारी (ता. २१) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.७ (१५.१), नगर ३९.८ (१५.०), जळगाव ३८.२ (१९.०), कोल्हापूर ३६.६ (१९.८), महाबळेश्‍वर (१६.६), मालेगाव ३९.० (१८.६), नाशिक ३५.० (१५.६),  सांगली ३७.६ (१६.४), सातारा ३७.१ (१७.६), सोलापूर ३९.९ (२१.५), सांताक्रुझ ३१.६ (२०.५), अलिबाग (२०.३), रत्नागिरी ३१.४ (२१.३), डहाणू  (२०.०), औरंगाबाद ३७.४ (१७.६), नांदेड ३९.५, अकोला ४०.० (२२.८), अमरावती ३९.८ (१९.८), बुलडाणा ३६.२ (२१.०),  ब्रह्मपुरी ३६.२ (१९.३), चंद्रपूर ३७.८ (२३.६), गडचिरोली ३४.० (२३.०), गोंदिया ३४.४ (१६.०), नागपूर ३७.१ (२०.२), वर्धा ३७.५ (२०.८), वाशीम ३८.० (२०.०), यवतमाळ ३८.५ (२०.०).

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...