agriculture news in marathi, hailstrom hits crops in marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यात एक लाख ४७ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद  : मराठवाड्यात फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १ लाख ४७ हजार २०७ हेक्‍टरवरील सर्व पिकांचे ३३ व ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे प्रशासकीय पंचनाम्याअंती समोर आले आहे. या संदर्भात मदतीसाठी विभाग स्तरावरून शासनाला जवळपास १३० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद  : मराठवाड्यात फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १ लाख ४७ हजार २०७ हेक्‍टरवरील सर्व पिकांचे ३३ व ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे प्रशासकीय पंचनाम्याअंती समोर आले आहे. या संदर्भात मदतीसाठी विभाग स्तरावरून शासनाला जवळपास १३० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले होते. प्राथमिक अंदाजात १ लाख ९६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली होती. या संदर्भात शासनाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्‍तांना पत्र पाठवून ३३ टक्‍के ते ५० टक्‍के व ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राची वर्गवारी स्वतंत्रपणे करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. चार दिवसांत हा अहवाल पाठविण्याचेही कळविण्यात आले होते. त्यानुसार मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता सातही जिल्ह्यांतील नुकसानीचा अहवाल विभाग स्तरावरून शासनाला सादर करण्यात आला आहे.

त्यामध्ये ३३ टक्‍के ते ५० टक्‍के नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये जिरायत, बागायत व फळपिके मिळून ७८ हजार ६२६.३९ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. या नुकसानभरपाईपोटी जिरायतीकरिता ६८०० रुपये प्रतिहेक्‍टरीप्रमाणे ४० कोटी ५४ लाख, बागायतीसाठी १३,५०० रुपये प्रतिहेक्‍टरीप्रमाणे २१ कोटी ९३ लाख,
तर फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्‍टरीप्रमाणे ४ कोटी  ९७ लाख ९ हजार रुपये, असे एकूण ६७ कोटी ४४ लाख २७ हजारांची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसरीकडे ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या ६८ हजार ५८१ हेक्‍टरवरील पिकांसाठी जिरायतकरिता ६८०० प्रतिहेक्‍टरप्रमाणे ३१ कोटी ३५ लाख ५५ हजार, बागायतीसाठी २५ कोटी ५८ लाख १२ हजार, तर फळपिकांसाठी हेक्‍टरी १८ हजार प्रमाणे ६ कोटी ३३ लाख ८० हजार रुपये, असे एकूण ६३ कोटी २७ लाख ४७ हजार  नुकसानभरपाईची रकमेची आवश्‍यकता पडेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जवळपास ६१ हजार हेक्‍टरवरील रब्बी ज्वारीचे, तर १८ हजार ४५५ हेक्‍टवरील हरभरा पिकाचे अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. विभाग स्तरावरून शासनाला अपेक्षित नुकसानीची माहिती कळविण्यात आली आहे. आता शासन किती तत्परतेने मदतीसाठीची पावले उचलते, याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता सात जिल्ह्यांतील ४ लाख ५२ हजार ८११ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ३३ टक्‍के ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान नुकसान झालेल्या २ लाख ९४  हजार ५३३ व ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या १ लाख ५८ हजार २७८ शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांतील केळी, द्राक्ष, पपई, डाळिंब, मोसंबी, आंबा, चिकू, संत्रा आदी फळपिकांच्या ६२८२ हेक्‍टवरील क्षेत्राला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. त्यामध्ये ३३ टक्‍के ते ५०टक्‍के दरम्यान नुकसान झालेल्या ३५२१.११ हेक्‍टरवरील, तर ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या २७६१.५९ हेक्‍टरवरील फळपिकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...