agriculture news in marathi, hailstrom hits in Jat taluka, sangli | Agrowon

जत तालुक्यात गारपिटीने द्राक्ष, पपईच्या बागांचे मोठे नुकसान
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

सांगली : जत तालुक्यातील बागेवाडी, रामापूर, शेगाव येथे गुरुवारी (ता.25) सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे व घाटगेवाडी परिसरात गारपिटीमुळे द्राक्ष आणि पपईचे मोठे नुकसान झाले आहे. रामापूर ३०० एकर वरील द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याची भीती. महसूल विभागाने या भागातील नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.

सांगली : जत तालुक्यातील बागेवाडी, रामापूर, शेगाव येथे गुरुवारी (ता.25) सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे व घाटगेवाडी परिसरात गारपिटीमुळे द्राक्ष आणि पपईचे मोठे नुकसान झाले आहे. रामापूर ३०० एकर वरील द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याची भीती. महसूल विभागाने या भागातील नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.

जत शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चार वाजण्याच्यादरम्यान तालुक्याच्या दक्षिण भागात विजांचा कडकडाट सुरू झाला. परंतु पाऊस पडला नाही. त्यादरम्यान बागेवाडी (ता. जत) येथे सायंकाळी पाच वाजण्याच्यादरम्यान वादळी वाऱ्यामुळे भगवान पडोळकर, सुखदेव आडगळे, शिवाजी वाघमारे यांच्या घरांवरील पत्रे व कौले उडून नुकसान झाले आहे. या परिसरात काही ठिकाणी वादळी वाºयाने झाडे उन्मळून पडली.

नुकसानीचा व्हिडिअो...

जतपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटगेवाडी व रामापूर गावाच्या उत्तर बाजूला सुमारे तीन चौरस किलोमीटर परिसरात सायंकाळी अचानक गारपीट झाली.घाटगेवाडी येथे वादळी वारा, गारपिटीच्या पावसाने पपई बागेचे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुपारी चार ते पाचच्यासुमारास वादळी वार्यासह गारांचा पाऊस झाला.

वादळी पाऊस व गारा पडल्याने पपई बागेला आलेल्या फुलकळीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या बागेचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर कुलकर्णी यांच्या शेताशेजारील शशिकांत भोसले यांच्या एक एकर पपई बागेचेही अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...