गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टर

गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टर
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टर

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १९ जिल्ह्यांतील सुमारे १०२ तालुक्यांमधील ३७२४ गावांमधील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, ज्वारी, मका यासह कांदा व फळ पिकांचा समावेश आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही माहिती दिली. अमरावती जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून, त्यातील ५१० गावामधील सुमारे ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ बुलडाणा ३३० गावे, ४१ हजार हेक्टर, तर जालना जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टरचा समावेश आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे सुरू आहेत. बाधित १९ जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, नांदेड, जळगाव, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे. एकूण ३,७२४ गावातील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजूनही पंचनामे सुरू आहेत. बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

नुकसानाची जिल्हा, तालुका, गावनिहाय माहिती अशी (कंसात बाधित हेक्टर क्षेत्र) ः बीड- माजलगाव, गेवराई, शिरुर- ४२ गावे (१० हजार ६३२ हेक्टर), जालना- जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड- १७५ गावे (३२ हजार हेक्टर), परभणी- सेलू व जिंतूर- २३ गावे (८ हजार ५७९ हेक्टर), जळगाव- जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर- ३८ गावे (२ हजार ४९५ हेक्टर), बुलडाणा- चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा- ३३० गावे (४० हजार ३८५ हेक्टर)   अमरावती- मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी व चिखलदरा- ५१० गावे (४५ हजार ८६८ हेक्टर), अकोला- मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार- १०१ गावे (४ हजार ३६० हेक्टर), वाशिम- रिसोड व मालेगाव - ३११ गावे (२६ हजार २८७ हेक्टर), लातूर - लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगा, शि. अनंतपाळ- ३०८ गावे (१६ हजार ३६१ हेक्टर ) उस्मानाबाद- उमरगा व उस्मानाबाद- १२२ गावे (३० हजार ११२ हेक्टर), हिंगोली- सेनगाव व औढा- ३९ गावे (१३९३ हेक्टर), नांदेड- नायगाव, बिलोली, माहूर, किनवट, हदगाव, हि. नगर, धर्माबाद- ३२७ गावे (२९ हजार ५३५ हेक्टर), यवतमाळ- १० तालुके - २७६ गावे (१३ हजार २६८ हेक्टर), चंद्रपूर- वरोरा, भद्रावती, राजुरा- ५२ गावे (२८५५ हेक्टर), गोंदिया- देवरी, गोंदिया, सडकअर्जनी, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोर, आमगाव, सालकेसा- ३५१ गावे (४३३१ हेक्टर), वर्धा- देवळी, हिंगणघाट, आर्वी, सेलू, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, वर्धा- ३०६ गावे (५८०० हेक्टर), नागपूर- कामठी, सावनेर, काटोला, नरखेड, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरखेड- ३७४ गावे (१४५५९ हेक्टर), भंडारा- मोहाडी, तुमसर- ३२ गावे (१५५४ हेक्टर), गडचिरोली- कोरची- ७ गावे (२१ हेक्टर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com