agriculture news in marathi, Hailstrom in Shirpur, Tur, onion, Cotton crop damage | Agrowon

शिरपुरात गारांचा पाऊस, तूर, कांदा, कपाशीचे नुकसान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

जळगाव : खानदेशात धुळे व जळगाव जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारी (ता.२१) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्यात शिरपूर तालुक्‍यातील शहादा (जि. नंदुरबार) रस्त्यावरील वरूळ भटाणे परिसरात, तर निंबूपेक्षा मोठ्या गारा काही वेळ पडल्या. या पावसामुळे तूर, कांदा, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

जळगाव : खानदेशात धुळे व जळगाव जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारी (ता.२१) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्यात शिरपूर तालुक्‍यातील शहादा (जि. नंदुरबार) रस्त्यावरील वरूळ भटाणे परिसरात, तर निंबूपेक्षा मोठ्या गारा काही वेळ पडल्या. या पावसामुळे तूर, कांदा, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

धुळे शहर व लगतच्या कुसुंबे, नेर, कापडणे, न्याहळोद, जापी आदी भागांत सायंकाळी ५.४०च्या सुमारास पाऊस आला. पावसाळ्यात दिसला नाही एवढा जोर पावसाचा होता. या पावसामुळे कपाशी लोळली, तर कांदा पिकात पाणी साचून त्यात मर रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच सूक्ष्मसिंचन किंवा बागायती तुरीचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. 

पावखेडा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे व लगतच्या भागात एक तास जोरदार पाऊस झाला. त्यात सुसाट वाराही होता. वृक्ष उन्मळून पडले असून, विजेचे खांबही वाकले. वीज बंद झाली. ती बुधवारी (ता.२२) सकाळीदेखील सुरळीत झालेली नव्हती. 

धुळे जिल्ह्यातील वरूळ भटाणे (ता. शिरपूर) या शहादा (जि. नंदुरबार) रस्त्यावरील गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गारांचा पाऊस झाला. निंबूपेक्षा मोठा गारांचा आकार होता. दोन ते तीन मिनिटे गारा पडल्या. त्यात गहू, कांदा, कपाशी व केळी या पिकांचे या भागात नुकसान झाल्याची माहिती आहे. 

जळगाव जिल्ह्यातही फटका
जळगाव जिल्ह्यातील मंगरूळ व शिरूर (ता.अमळनेर), मेहुणबारे (ता.चाळीसगाव) आदी भागांत मंगळवारी पाऊस झाला. पावसाने तूर पिकात फुलगळ वाढण्याची शक्‍यता आहे. पारोळा शहरासह लगतच्या भागातही पाऊस झाला. तसेच मेहुणबारे, पिलखोड (ता.चाळीसगाव) भागातही सायंकाळी किरकोळ पाऊस झाला. त्यात कांदा व कपाशीच्या पिकाच्या नुकसानीची भिती निर्माण झाली आहे. गणपूर (ता.चोपडा) येथेही सात ते आठ मिनिटे किरकोळ पाऊस झाला. त्यात उसतोडणी मजुरांची तारांबाळ उडाली. तसेच उघड्यावरील मका, ज्वारी यांची नासाडी होण्याची भिती निर्माण झाली. 

प्रतिक्रिया...
वरूळ भटाणे या शिरपुरातील गावांमध्ये मंगळवारी गारपीट झाली. त्यात गहू, हरभरा आदी पिकांच्या नुकसानीची भीती आहे. पाऊसही सुमारे पाऊण तास झाला. 
- विजय पाटील, शेतकरी, शिंदखेडा, जि.धुळे

आमच्या भागात किरकोळ सरी कोसळल्या. मोठे नुकसान झालेले नाही, परंतु ढगाळ वातावरणाचा फटका तुरीला बसत आहे. 
- किरण पवार, शेतकरी, घोडेगाव (ता.चाळीसगाव, जि.जळगाव)

इतर बातम्या
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
‘पिंपळगाव खांड’तून पिण्यासाठी आवर्तनलिंगदेव, जि. नगर : मुळा नदीवरील पिंपळगाव खांड (ता...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
कोल्हापूर जिल्ह्यात वाढती थंडी रब्बी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
कॅनॉल दुरुस्तीची कामे आता जलयुक्‍त...वर्धा : जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...