विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात आजपासून पावसाचा अंदाज

विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात आजपासून पावसाचा अंदाज
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात आजपासून पावसाचा अंदाज

पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. २४) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात रविवारपर्यंत पावसाची शक्यता असून, त्यांनतर किमान तापमानात घट होऊन थंडी पुन्हा वाढणार आहे.  पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्लीसह परिसरात पाऊस पडला असून, तुरळक ठिकाणी गारपीटही झाली अाहे. वायव्य राजस्थानपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय अाहे. पश्‍चिमी चक्रवात आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये परस्पर विरोधी क्रिया होणार आहे. यातच उत्तर भारतात असलेल्या थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये आज आणि उद्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात रविवारपर्यंत (ता. २७) पावसाची शक्यता आहे. तर उत्तर कर्नाटक, तेलंगणा, अांध्र प्रदेशच्या किनारपट्टीय भागात रविवारी हलक्या पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आहे. पाऊस थांबल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली अाहे.  बुधवारी (ता. २३) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.९ (-०.२), जळगाव १३.० (०.८), कोल्हापूर १५.८ (०.५), महाबळेश्‍वर ११.४ (-२.३), मालेगाव १३.४ (२.७), नाशिक १२.८, सांगली १२.८ (-१.५), सातारा १०.१ (-२.६), सोलापूर १५.७ (-०.८), सांताक्रूझ १९.२ (२.४), अलिबाग १८.८ (१.६), रत्नागिरी १७.९ (-०.७), डहाणू १८.८ (१.८), आैरंगाबाद ११.८ (-०.६), परभणी १४.५ (-०.२), नांदेड १४.० (०.१), अकोला १५.० (०.७), अमरावती १३.० (-१.९), बुलडाणा १२.४ (-२.५), चंद्रपूर १२.८ (-२.७), गोंदिया १४.० (०.५), नागपूर १३.६ (-०.२), वर्धा १४.९ (०.८), यवतमाळ १६.० (०.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com