निम्मा महाराष्ट्र माॅन्सूनने व्यापला

निम्मा महाराष्ट्र माॅन्सूनने व्यापला
निम्मा महाराष्ट्र माॅन्सूनने व्यापला

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. ९) जोरदार मुसंडी मारत निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सूनने बहुतांशी कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अाणखी काही भागांमध्ये धडक देत, मुंबईसह ठाणे, नगर, परभणी, यवतमाळ, चंद्रपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाने जोर धरला असून, उर्वरित भागातही ढगाळ हवामानासह पावसाला सुरुवात झाली आहे.

मॉन्सूनने शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात एकाच वेळी प्रवेश करत महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी राज्याच्या आणखी काही भागापर्यंतचा टप्पा पूर्ण करताना कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह ठाणे जिल्‍ह्याचा बहुतांशी भाग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुण्यासह नगरचा काही भाग, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, हिंगोलीसह जालना जिल्ह्याचा काही भाग आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्याचा मोठा भाग व्यापला आहे.

तर छत्तीसगड, अोडिशा, वायव्य बंगालच्या उपसागरामध्येही शनिवारी (ता. ९) मॉन्सूनने प्रगती केली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्याने सोमवारपर्यंत (ता. ११) छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत प्रगती शक्य अाहे. तर, बुधवारपर्यंत (ता. १३) झारखंड आणि बिहार राज्यात मॉन्सून पोचण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने ओडिशा, झारखंड, बिहार, पश्‍चिम बंगालसह उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. ही प्रणाली पोषक ठरल्यास मॉन्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com