agriculture news in Marathi, hamal-workers and traders called off in parbhani agriculture market committee, Maharashtra | Agrowon

परभणी बाजार समितीत हमाल-कामगार, व्यापाऱ्यांचा बंद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हमाल-कामगारांचा संप सुरू असताना बाजार समिती यार्डावरील मार्केट व्यापारी असोसिएशनतर्फे सोमवारी (ता. २७) बेमुदत बंद सुरू करण्यात आला आहे. या बंदमध्ये अडत व्यापारी महासंघ, जिनिंग-प्रेसिंग असोशिएशन, कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी झाल्यामुळे बाजार समिती यार्डातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पाच दिवसांपासून शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हमाल-कामगारांचा संप सुरू असताना बाजार समिती यार्डावरील मार्केट व्यापारी असोसिएशनतर्फे सोमवारी (ता. २७) बेमुदत बंद सुरू करण्यात आला आहे. या बंदमध्ये अडत व्यापारी महासंघ, जिनिंग-प्रेसिंग असोशिएशन, कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी झाल्यामुळे बाजार समिती यार्डातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पाच दिवसांपासून शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

माथाडी कामगार कायद्याच्या अमंबजावणीसाठी मजदूर युनियन (लाल बावटा)ने गुरुवार (ता. २२) पासून बेमुदत संप सुरू केला आहे. जिल्हा प्रशासन, हमाल-कामागार, बाजार समिती प्रशासन, व्यापारी असोसिएशन यांच्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हमाल कामगारांचा संप सुरूच आहे.

या संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडती, जिनिंग-प्रेसिंग, कृषी निविष्ठा, किराणा मालाचे गोदाम आदी ठिकाणची कामे ठप्प झाली आहेत. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गतच्या खरेदी केंद्रावरील शेतीमालाच्या खरेदीदेखील बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हमाल -कामगार कामावर येत नसल्याने व्यवहार ठप्प झाल्यामुळे परभणी येथील बाजार समितीतील सध्याचे हमालीचे दर मराठवाड्यातील इतर बाजारपेठांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे व्यापारी हमालीच्या दरात आणखी वाढ करण्यास व्यापारी तयार नाहीत. हमालीचे दर वाढविल्यास त्याचा परिणाम बाजारपेठेवर होऊ शकतो. त्यामुळे नवा मोंढा भागातील बाजारपेठ बेमुद बंद ठेवण्यात येणार आहे, असे मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल जैन, उपाध्यक्ष गोविंद अजमेरा, जिनिंग-प्रेसिंग संघटनेचे हरीश कत्रुवार यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी (ता. २७) सकाळी माथाडी कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मजदूर युनियन (लाल बावटा)तर्फे विलास बाबर, राजन क्षीरसागर, शेख महेबूब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हमाल-कामगारांचा मोर्चा काढण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...