agriculture news in Marathi, Hanmantrao gaikwad says degaon food perk inauguration on Thursday, Maharashtra | Agrowon

देगाव फूड पार्कचे गुरुवारी उद्‌घाटन ः हणमंतराव गायकवाड
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

पुणे ः प्रक्रिया उद्याेगांतून राेजगारनिर्मितीसह शेतीमालाला अधिकचा दर देता यावा, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या देगाव (ता. जि. सातारा) येथील राज्यातील पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. १) केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्याेगमंत्री हरसिमरत काैर यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी अडीच वाजता हाेणार आहे, अशी माहिती फूड पार्क आणि भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. २३) पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

पुणे ः प्रक्रिया उद्याेगांतून राेजगारनिर्मितीसह शेतीमालाला अधिकचा दर देता यावा, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या देगाव (ता. जि. सातारा) येथील राज्यातील पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. १) केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्याेगमंत्री हरसिमरत काैर यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी अडीच वाजता हाेणार आहे, अशी माहिती फूड पार्क आणि भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. २३) पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

या वेळी बाेलताना गायकवाड म्हणाले, ‘‘देशातील एकूण शेतीमालाच्या उत्पादनापैकी ९९ टक्के शेतीमाल थेट बाजारात विक्रीसाठी पाठविला जाताे. तर केवळ १ टक्के शेतीमालावरच प्रक्रिया केली जाते. माेठ्या प्रमाणावर शेतीमाल बाजारात विक्रीसाठी जात असल्याने शेतीमालाची नासाडीदेखील हाेत असल्याने शेतकऱ्यांचे माेठे आर्थिक नुकसान हाेत आहे. हे नुकसान टाळत प्रक्रिया उद्याेगांमधून शेतीमालाला अधिकचा दर मिळावा, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने मेगा फूड पार्क याेजना राबविण्यात येत आहे. 

या याेजनेतील राज्यातील पहिला मेगा फूड पार्क ७० एकर क्षेत्रावर उभारण्यात आला आहे. या फूड पार्कमधून विविध शेतीमालावर प्रक्रिया करून निर्यात करण्यात येणार आहे. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची २५० एकरांवर करार शेतीदेखील भारत विकास ग्रुपच्या वतीने करण्यात येणार आहे. यामध्ये हळद, आले, डाळिंब, साेनचाफा, फणस, जांभूळ, आमसूल आदींवर प्रक्रिया करण्यात येणार आहे.’’ 

फूड पार्कमध्ये पल्पिंग लाइन, शीतगृह, गाेदाम, विविध चाचण्यांसाठी प्रयाेगशाळा, प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. ज्या नव उद्याेजकांना या उद्याेगात यावयाचे असेल त्यांच्यासाठी भाडेतत्त्वादेखील विविध प्रक्रिया करून देण्याची व्यवस्था पार्कमध्ये करण्यात आली आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले. या वेळी पार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार चाेले उपस्थित हाेते.

पारंपरिक खाद्यसंस्कृतीसाठी देखील जागा देणार 
ग्रामीण भागात घराघरात लाेणची मसाले केली जातात. काही महिलांच्या हाताला विशिष्ट चव असते, ती महिला. त्या पाककृतीसाठी परिसरात प्रसिद्ध असते. अशा महिलांनादेखील उद्याेजकतेसाठी फूड पार्कमध्ये एक हजार चाैरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

केंद्राच्या धर्तीवर राज्याने १५ टक्के अनुदान द्यावे 
अन्नप्रक्रिया उद्याेगांसाठी केंद्र शासनाकडून ‘संपदा’ याेजनेअंतर्गत ५ काेटी किंवा ३५ टक्के अनुदान दिले जाते. याच धर्तीवर राज्य शासनाने ५० लाखांएेवजी २ काेटींचा निधी द्यावा, आणि कर्जाच्या व्याजावर ५ टक्के सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...