पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवक

हापूस आंब्याची आवक
हापूस आंब्याची आवक

पुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या हंगामातील पहिली पेटी रविवारी (ता. १८)  गुलटेकडी बाजार समितीमध्ये दाखल झाली. या वेळी पांरपरिक पद्धतीने पूजा करून स्वागत करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील माणकोट येथील शेतकरी सतारभाई यांच्या बागेतून दोन डझनाच्या सहा पेट्यांची आवक आडते सौरभ कुंजीर यांच्या गाळ्यावर झाली. दोन डझनाचा भाव २१०० रुपये असा निघाला.

दरवर्षी हापूस आंब्यांची आवक जानेवारीच्या दरम्यान सुरू होते. यंदा मात्र दीड ते दोन महिने आधीच आवक झाली आहे. गेल्या रविवारीही बाजारात आंब्यांची आवक झाली होती. मात्र ती आवक मुंबई येथील बाजारातून झाली होती. थेट कोकणातून पुण्यातील बाजारात झालेली ही या हंगामातील पहिलीच आवक असल्याचे कुंजीर यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com