agriculture news in marathi, The Haranbari right, the Kelzer canal Order from surveyor Shivtar | Agrowon

हरणबारी उजवा, केळझर कालव्याच्या सर्व्हेक्षणाचे शिवतारे यांच्याकडून आदेश
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

सटाणा, जि. नाशिक : हरणबारी वाढीव उजवा कालवा आणि केळझर वाढीव कालवा क्रमांक आठच्या कामांचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिले, अशी माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.

सटाणा, जि. नाशिक : हरणबारी वाढीव उजवा कालवा आणि केळझर वाढीव कालवा क्रमांक आठच्या कामांचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिले, अशी माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.

चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यांतून गुजरातकडे वाहून जाणारे वळण योजनांद्वारे उपलब्ध झालेले क्र. ५३.०२ दलघफू पाणी हरणबारी व केळझर वाढीव कालव्यांसाठी उपलब्ध झाले आहे. बागलाण हा अवर्षणप्रवण तालुका आहे. या कालव्यांच्या कामांचे सर्व्हेक्षण करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने प्रधान सचिवांना सर्व्हेक्षणाचे आदेश दिले.

सततच्या दुष्काळी परिस्थिीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकरी आत्महत्यांचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून पाणी हरणबारी वाढीव उजवा कालवा पारनेर ते सातमाने व केळझर वाढीव कालवा क्र . आठ मुळाणेपासून वायगावपर्यंत मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार विधानमंडळ समितीने मंजुरी दिली आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...
इतिवृत्तात शेतकरी प्रतिनिधींच्या...नांदेड : ऊसदर निश्चित करण्याच्या बाबतीत...
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार...यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न...
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत... पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
फुलांना भेट देणाऱ्या किटकांचे डीएनए...किटकांनी फुलांना भेट दिल्यानंतर तिथे सूक्ष्म असे...
रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटलेजालना : मनरेगाअंतर्गत मिळणारे पेमेंट...
जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून...जळगाव : शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा...
जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या...जळगाव  : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर...
आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूलतासगाव, जि. सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर...
गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना...गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत...