agriculture news in marathi, hard way to farmers for selling maize, jalgaon, maharashtra | Agrowon

मका विक्रीच्या रकमेसाठी जळगावमधील शेतकऱ्यांची पायपीट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जानेवारी 2018

जे चुकारे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, त्यासंबंधी वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा केली आहे. लवकरच शेतकऱ्यांना चुकारे दिले जातील. ३० जानेवारीपर्यंत मका खरेदी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन.

जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील मका विक्रीचे शेतकऱ्यांचे चुकारे किंवा रक्कम मार्केटिंग फेडरेशनकडून प्राप्त झालेली नाही. सुमारे दोन कोटी रुपये रक्कम फेडरेशनकडून येणे बाकी असून, शेतकऱ्यांची या रकमेसाठी बॅंकेत पायपीट सुरूच आहे.

जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मक्‍याची खरेदी शासकीय खरेदी केंद्रात सुरू आहे. त्यासाठी पारोळा, चोपडा, अमळनेर, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ आदी आठ खरेदी केंद्रे सुरू आहेत. एरंडोल येथील खरेदी केंद्र शेतकऱ्यांची नोंदणी नसल्याने बंद केले आहे.

जिल्हाभरात ३१ हजार क्विंटल मक्‍याची खरेदी झाली असून, यापैकी सुमारे साडेचार ते पाच हजार क्विंटल मक्‍याचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची माहिती आहे. हे चुकारे केव्हा मिळतील, यासाठी मका उत्पादक शेतकरी संबंधित बॅंकेत चकरा मारत आहेत. ही रक्कम थेट बॅंकेत जमा होणार आहे.

मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडून थेट बॅंकेत रक्कम भरली जाते. स्थानिक कार्यालयांना फक्त किती रक्कम वितरित केली याची माहिती मिळते. यातच जे शेतकरी शेतकी संघात चुकाऱ्यांच्या मागणीसंबंधी जातात, त्यांना शेतकी संघातून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांचा मनःस्ताप वाढला आहे. बाजारात मक्‍याचे दर पाडल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रात १४२५ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावात त्याची विक्री केली. परंतु या केंद्रात महिनाभरापासून चुकारे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.

शेतकऱ्यांच्या शेतकी संघाकडे चुकाऱ्यांसाठी वाढत्या चकरा लक्षात घेता मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला. वरिष्ठ कार्यालयाने चुकारे एक ते दोन दिवसांत दिले जातील. शेतकऱ्यांच्या खात्यांत रक्कम जमा होईल, असे जिल्हा कार्यालयास सांगितले असल्याची माहिती मिळाली.

ज्या शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत मका विक्रीसंबंधीची ऑनलाइन नोंदणी केली आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांच्या मक्‍याची खरेदी येत्या मंगळवारपर्यंत (ता. ३०) पूर्ण करण्याचा प्रयत्न मार्केटिंग फेडरेशन करीत आहे. जिल्हाभरात अद्याप सुमारे २५० नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मक्‍याची खरेदी झालेली नसल्याचे सांगण्यात आले.
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...